हिंदू महासभेच्या नेत्याच्या हत्येप्रकरणी तिघांना अटक

पीटीआय
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे नेते रणजित बच्चन यांच्या हत्येप्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी काल रात्री मुंबईत येऊन तिघांना पकडले. यात रणजित बच्चन यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरचाही सहभाग आहे.

मुंबई - आंतरराष्ट्रीय हिंदू महासभेचे नेते रणजित बच्चन यांच्या हत्येप्रकरणात उत्तर प्रदेश पोलिसांना मोठे धागेदोरे हाती लागले आहेत. याप्रकरणी उत्तर प्रदेश पोलिसांनी काल रात्री मुंबईत येऊन तिघांना पकडले. यात रणजित बच्चन यांच्यावर गोळीबार करणाऱ्या शूटरचाही सहभाग आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रणजित बच्चन हत्याकांडाचे गूढ उकलण्यासाठी विशेष कृती दलाचे पथक मुंबईला आले होते. काल रात्री पोलिसांनी संशयितावर पाळत ठेवली आणि हत्येच्या दिवशीच्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावर तिघांना पकडले. तिन्ही आरोपींना लखनौला नेण्यात येणार आहे. रणजित बच्चन यांच्या काही नातेवाइकांच्या फोन कॉल्सचे विवरण तपासल्यानंतर पोलिस मारेकऱ्यापर्यंत पोचले. २ फेब्रुवारी रोजी लखनौत रणजित बच्चन यांची हत्या केल्यानंतर हे शूटर मुंबईत येऊन लपले. पोलिसांचे आठ पथके चौकशीसाठी रवाना करण्यात आले होते. तसेच संशयिताची माहिती देणाऱ्यास ५० हजारांचे बक्षीसही जाहीर करण्यात आले होते. उत्तर प्रदेश पोलिसांनी गोरखपूर येथून तीन, रायबरेलीतून एका संशयिताला पकडले होते. गोरखपूर येथून ताब्यात घेतलेला संशयित हा रणजित बच्चन यांच्या ओळखीचा होता, असे पोलिसांनी सांगितले. त्यांच्या हत्येचे कारण अद्याप समजू शकले नाही. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Three arrested for murder of Hindu Mahasabha leader