esakal | आता सह्याद्रीतही दिसणार वाघ, विदर्भातून वाघांचे स्थलांतर!
sakal

बोलून बातमी शोधा

Tiger

आता सह्याद्रीतही दिसणार वाघ, विदर्भातून वाघांचे स्थलांतर!

sakal_logo
By
राजेश रामपूरकर

नागपूर : विदर्भातील चंद्रपूर (chandrapur tiger) जिल्ह्यातील जंगलातील वाघांची संख्या वाढल्याने मानव- वन्यजीव संघर्ष वाढला आहे. तो कमी करण्यासाठी विदर्भातील वाघांचे स्थलांतरण सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात (sahyadri forest) करण्याबाबत सकारात्मक निर्णयाची शक्यता आहे. त्यासाठी युद्धपातळीवर तयारी केली जात असून पहिल्या टप्प्यात चांदोली वन परिक्षेत्रातील (chandoli forest) झोळंबी सांबर तर कोयना वनपरिक्षेत्रातील (koyana forest) डिचोली येथेही चितळ सोडणार आहे. या क्षेत्रात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढल्यानंतर वाघांचे स्थलांतरणावर शिक्कामोर्तब होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. (tigers from vidarbha will transfer to sahyadri forest)

हेही वाचा: International Tiger Day 2021 : वाघ खरंच 'नरभक्षी' असतो का?

राज्यात ३१२ पेक्षा अधिक वाघ आहेत. त्यातील ३०० हून अधिक वाघ विदर्भात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात जैवविविधता समृद्ध आणि वनाच्छादनही चांगले असल्याने वाघांचा अधिवास आहे. त्यामुळे त्या परिसरात वाघ आणि मानवातील संघर्ष वाढतो आहे. त्यापाठोपाठ यवतमाळ जिल्ह्यालाही हा संघर्ष वाढू लागला आहे. त्यामुळेच वाघांची संख्या कमी करण्यासाठी स्थलांतरणावर अनेक दिवसापासून विचार मंथन करण्यात येत आहे. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर झालेल्या पहिल्या राज्य वन्यजीव मंडळाच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली होती. तेव्हा काही सदस्यांनी यावर विचार करण्याची सूचना केली होती. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाघांच्या स्थलांतरणाबाबत तज्ज्ञ, अभ्यासक आणि भारतीय वन्यजीव संस्थेची मदत घेऊन यावर निर्णय घ्यावा अशी सूचना केली होती. तत्पूर्वी त्या परिसरात असलेल्या वाघांची संख्या वाढविण्यासाठी त्या परिसरात तृणभक्षक प्राणी सोडण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. हा दोन वर्षाचा कार्यक्रम असून या काळात तृणभक्षक प्राण्यांची संख्या वाढल्यानंतर वाघांच्या स्थलांतरणाबाबत निर्णय घेतला जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

राज्य सरकारने वन्यजीव व्यवस्थापनासाठी राज्यस्तरीय कृती आराखडा तयार केला असल्याची माहिती आहे. त्यात पुढील दहा वर्षात वन्यजीव संवर्धनाच्या दृष्टीने आराखडा तयार करण्यात आल्याचे बोलले जात आहे. त्यात मानवाच्या संरक्षणासाठी वन्यजीवांच्या संवर्धनावरही विशेष लक्ष देण्यात आले आहे. मानव आणि वन्यजीव सहजीवन सुकर कसे होईल याबाबतही त्यात विचार करण्यात आल्याची माहिती आहे.

वाघांची संख्या -

जिल्हा वाघांची संख्या

  • चंद्रपूर - १८०

  • नागपूर - ६५

  • यवतमाळ - १०

  • वर्धा - १२

  • अमरावती -४५

विदर्भात ३०० पेक्षा अधिक वाघ असून चंद्रपूर जिल्ह्यात सर्वाधिक १८० ते १८५ वाघ आहे. संरक्षित क्षेत्रात ६० टक्के तर उर्वरित ४० टक्के वाघ असंरक्षित क्षेत्रात आहेत. त्यामुळे वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढला आहे. वाघांचे स्थलांतरण हा अतिशय ज्वलंत प्रश्न आहे. मात्र, त्यादृष्टीने सकारात्मक पावले उचलण्यात येत आहे. तशी तयारीही केली जात आहे. चांदोली आणि कोयना वन परिक्षेत्रात तृणभक्षक प्राणी सोडण्यात येणार आहे.
-सुनील लिमये, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव)
वाघांचे स्थलांतरण करणे हा नवीन प्रयोग नाही. त्यासाठी प्रशासनाला तयारी करावी लागणार आहे. त्यासाठी परिसरातील नागरिक आणि वन्यजीव क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित केल्यास वाघाचे स्थलांतरण करता येते.
- किशोर रिठे, सदस्य, राज्य वन्यजीव मंडळ
loading image
go to top