

prithviraj chavan
esakal
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी व्हेनेझुएलामधील नाट्यमय घटनांवरून केंद्र सरकारला लक्ष्य केले आहे. अमेरिकेच्या विशेष दलांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांना त्यांच्या देशातून पकडून अमेरिकेत नेले आणि न्यायालयात हजर केले, या कारवाईला त्यांनी संयुक्त राष्ट्रांच्या सनदेचे उल्लंघन म्हटले आहे. चव्हाण म्हणाले की, निवडून आलेल्या राष्ट्रप्रमुखाचे अशा पद्धतीने अपहरण करणे अत्यंत गंभीर बाब आहे आणि उद्या असेच काही भारतात घडू शकते.