esakal | राज्यात कोरोनाचा स्फोट, वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढ

बोलून बातमी शोधा

null

मुंबई,पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे.

राज्यात कोरोनाचा स्फोट, वर्षातील सर्वात मोठी रुग्णवाढ

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

महाराष्ट्रामध्ये आज धडकी भरवणारी कोरोना रुग्णांची वाढ झाली आली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत राज्यात ३० हजार ५३५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली आहे. रविवारी दिवसभरात ११ हजार ३१४ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत तर ९९ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.  राज्यातील आतापर्यंत २२ लाख १४ हजार ८६७ इतक्या रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर राज्यात सध्या दोन लाख १० हजार रुग्ण उपचाराधीन आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 89.32% झाले आहे.

मुंबई,पुणे आणि नागपूरसारख्या शहरांमध्ये दररोज कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत आहे. गेल्या २४ तासांत नागपूर, मुंबई आणि पुणे या शहरांमध्ये तीन हजारांपेक्षा जास्त कोरोना रुग्णांची वाढ झाली आहे. ही तिन्ही प्रमुख शहरं पुन्हा एकदा महाराष्ट्रातील कोरोना हॉटस्फॉट ठरत आहेत. 

नागपूरमध्ये २४ तासांत ३६१४ नवीन रुग्ण - 
महाराष्ट्राची उपराजधानी असलेल्या नागपूरमध्ये मागील २४ तासांत ३,६१४ नवीन कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी दिवसभरात १८५९ जणांनी कोरोनावर मात केली.  नागपूरमध्ये २९ हजार ३४८ रुग्ण उपचारधीन आहेत.  

मुंबईतील स्थिती - 
देशाची आर्थिक राजधानी मुंबईमध्येही पुन्हा एकदा कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्यानं वाढ होत असल्याचं आकडेवारीवरुन दिसत आहे. मागील २४ तासांत मुंबईत तीन हजार ७७५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला आहे. रविवारी १६४७ जणांनी कोरोनावर मात केली.  मुंबईतील एकूण उपचाराधीन रुग्णांची संख्या २३ हजार ४४८ इतकी आहे.  

पुण्यात कोरोनाचा विस्फोट -

मागील पाच दिवसांपासून पुण्यात प्रत्येक दिवसाला मिळाणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दुप्पट झाली आहे. पाच दिवसांत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल १२०.४ टक्क्यांनी वाढ झाली.  पुण्यातील उपचारादिन रुग्णांची संध्या ४२ हजार १५ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील सहा ठिकाणीला कोरोना हॉटस्फॉट म्हणून घोषीत करण्यात आलं आहे.