esakal | महाराष्ट्रातील या 10 उमेदवारांना मिळालं सर्वाधिक मताधिक्य !
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्रातील या 10 उमेदवारांना मिळालं सर्वाधिक मताधिक्य !

महाराष्ट्रातील हे आहेत नेते ज्यांच्या लढती महाराष्ट्रातील #Top10 लढती ठरल्यात. खालील नेते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने  आणि सर्वात कमी फरकाने निवडून आल्यात. 

महाराष्ट्रातील या 10 उमेदवारांना मिळालं सर्वाधिक मताधिक्य !

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रातील हे आहेत नेते ज्यांच्या लढती महाराष्ट्रातील #Top10 लढती ठरल्यात. खालील नेते महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने  आणि सर्वात कमी फरकाने निवडून आल्यात. 

  • अजित पवार 1 लाख 63 हजार 429 मताधिक्यानं विजयी

बारामती मतदार संघातून राष्ट्रवादीचे नेते अजित पवार 1 लाख 63 हजार ४२९ मताधिक्यानं विजयी झालेत. त्यांनी भाजप उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यासह आपल्या सर्व प्रतिस्पर्धी उमेदवारांचं डिपॉझिट जप्त केलंय. अजित पवार राज्यातील सर्वाधिक मतधिक्यानं विजय मिळवणारे उमेदवार ठरलेत.

  • विश्वजित कदम यांना 1 लाख 62 हजार 521 मतांचं मताधिक्य

काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांनी पलूस कडेगाव मतदारसंघातून १ लाख ६२ हजार ५२१ असं भरघोस मताधिक्य मिळवलंय. विशेष म्हणजे  विश्वजित कदम यांच्यानंतर दोन क्रमांकाची मतं ही नोटाला पडलीत. त्यांनी शिवसेना उमेदवार संजय विभुते यांचा पराभव केलाय.

  • किसन कथोरे 1 लाख 37 हजार 336 मतांनी विजयी

मुरबाड मतदार संघातून भाजपचे किसन कथोरे 1 लाख 37 हजार 336 मतांनी विजयी झालेत...त्यांनी राष्ट्रवादीचे प्रमोद हिंदुराव यांचा पराभव केलाय.

  • धीरज देशमुख 1 लाख 19 हजार 826 मतांनी विजयी

लातूर ग्रामीण मतदारसंघातून धीरज देशमुख यांनी विजय मिळालाय. धीरज देशमुख 1 लाख 19 हजार 826 एवढ्या विक्रमी मतांनी विजयी झालेत.  धीरज देशमुख यांनी शिवसेनेच्या सचिन देशमुख यांचा पराभव केलाय.

  • राहुल पाटील यांनी 80 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत विक्रमी विजयी

परभणीतून शिवसेना उमेदवार राहुल पाटील यांनी 80 हजाराहून अधिक मताधिक्य मिळवत विक्रमी विजय मिळविला. त्यांना 1 लाख 3 हजार मतं मिळाली. त्यांच्याविरोधातील अनेक उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालंय

  • महेश लांडगे 77 हजार 279 मतांनी विजयी

भोसरी विधानसभा मतदार संघात भाजप उमेदवार महेश लांडगे 77 हजार 279 मतांनी विजयी झालेत. त्यांनी राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्ष उमेदवार विलास लांडे यांचा पराभव केलाय. भोसरी मतदार संघात महेश लांडगे आणि  विलास लांडे यांच्यात दुरंगी लढत झाली. 

  • डॉ. विजयकुमार गावित 70 हजार 650 मतांनी विजयी  

नंदुरबारमधून भाजप उमेदवार डॉ. विजयकुमार गावित विक्रमी मतांनी  विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस उमेदवार उदेसिंग पाडवी यांचा 70 हजार 650 मतांनी पराभव केला. 

  • बबनराव शिंदे 68 हजार 549 विक्रमी मताधिक्यांनी विजयी

माढा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे बबनराव शिंदे सहाव्यांदा विजयी झालेत. बबनराव शिंदे 68 हजार 549 विक्रमी मताधिक्यांनी विजयी झालेत. त्यांना 1 लाख 41 हजार 701 मते मिळालीत. 

  • संजय रायमुलकर  यांनी 62 हजार 202 एवढ्या विक्रमी मतांनी विजयी 

बुलडाणा जिल्ह्यातील मेहकर मतदारसंघात युतीचे उमेदवार संजय रायमुलकर यांनी विजयाची हॅट्ट्रिक केलीय. संजय रायमुलकर  यांनी 62 हजार 202 एवढ्या विक्रमी मतांनी प्रतिस्पर्धी उमेदवाराचा पराभव केला....त्यांना एकूण १ लाख १२ हजार ३८ मतं मिळाली.

  • नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभूत 

मुंबईतत्या चांदिवली मतदार संघात मात्र धक्कादायक निकाल लागलाय. काँग्रेस उमेदवार नसीम खान यांचा अवघ्या 409 मतांनी पराभव झाला. नसीम खान यांना 85 हजार 470 तर  त्यांचे प्रतिस्पर्धी शिवसेनेचे दिलीप लांडे यांना 85 हजार ८७९ मतं मिळाली

WebTitle : top ten big fights in maharashtra vidhansabha elections

loading image