जंगल सफारीचा आनंद घ्या, पश्‍चिम घाटमाथ्यावरील 'या' गावात

आजपासून राष्ट्रीय उद्यान, जंगल सफारी सुरू होणार.
 tourism program
tourism program esakal

मुंबई: कोरोनाच्या (Coronavirus) पार्श्वभूमीवर बंद असलेले राज्यातील पर्यटन आजपासून सुरू होत आहे. यासंदर्भात ठाकरे सरकारची (Thackeray Government) नवीन नियमावली जाहीर झाली आहे. राज्यातील तिसऱ्या लाटेवर नियंत्रण मिळवल्याची माहिती कोरोना टास्क फोर्सने दिल्यानंतर राज्यातील निर्बंध पुन्हा एकदा शिथिल करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे आजपासून (१ फ्रेबुवारी )राष्ट्रीय उद्यान, जंगल सफारी सुरू होणार आहे. तुम्हाला जर जंगल सफारीचा आनंद घ्यायचा असेल तर एका बहुरंगी, बहुढंगी निसर्गसंपन्नतेने नटलेल्या पश्‍चिम घाटमाथ्यावरील शाहूवाडी तालुक्‍यातील आंबा या गावाला एकदा अवश्या भेट द्या.

कोकण, पश्‍चिम महाराष्ट्राचा मध्यबिंदू ठरणाऱ्या या ठिकाणी देशभरातील पर्यटक येत असतात. घनदाट जंगल, मंदिरे, दर्ग्यापासून ते वन्यजीवांचे ऐतिहासिक महत्त्व तुम्हाला याठिकाणी अनुभवायला मिळेल. शांत वातावरण,स्वच्छ पाणी आणि पक्षांचे थवे असा सुंदर नजारा तुम्हाला याठिकाणी पाहायला मिळेल.याच बरोबर जंगल सफारीचा आनंदही तुम्हाला अनुभवता येईल. येथील खाद्य संस्कृतीचा आस्वाद घेता येईल.

पर्यटनासाठी आंबाच का?

  • आंबा हे परिपूर्ण पर्यटनस्थळ आहे.

  • जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वात मोठी लढाई पावनखिंडी येथे झाली.

  • जगातील सर्वात मोठा ‘पतंग’ (कीटक) वर्षातून तीन वेळा आंब्यात पाहायला मिळतो.

  • ‘गारंबीचा वेल’ सर्वात मोठा असतो. त्याची शेंग साडेपाच फूट उंचीची येथे आढळते.

  • गेळा हा प्राणी हरीण वर्गात आहे. त्याची एक-दीड फूट उंचीचे लहान हरण या भागात आहेत.

  • मलबार पिटरवायपर हा सर्प पावसाळ्यात मध्यरात्री, इथल्याच घनदाट जंगलात दिसतो. त्याचे चार रंग येथे दिसतात.

  • गवा हा रेडा जंगली भागात पाहायला मिळतो.

  • सधन बडवी हे सर्वात मोठे फुलपाखरू व सर्वात लहान फुलपाखरू या परिसरात दिसते.

  • याशिवाय शेखरू प्राणी, हरेल, जारूल, निळीशंखी अशी फुले येथे पहायला मिळतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com