

Maharashtra
esakal
राजापूर: नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या पन्नास वर्षांपूर्वीच्या देशी भातवाणांचे जतन करून त्यांना नवसंजीवनी देण्याचे काम राजापूर तालुक्यातील खरवते येथील प्रगतशील शेतकरी दयानंद चौगुले यांनी केले आहे. त्यांनी जपलेल्या ‘मुंडगा’ आणि ‘सर्वट’ या पारंपरिक भातवाणांवर कृषी विभाग आणि डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठाने तब्बल सात वर्षे संशोधन केले. या संशोधनानंतर या दोन्ही वाणांना भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले.