

solapur cp office
sakal
तात्या लांडगे
सोलापूर : सोलापूर शहर उत्तर विभागाकडील वाहतूक शाखेचे अंमलदार राजेंद्र खाडे दुचाकीस्वाराला शिवीगाळ केल्याने राज्यभर चर्चेत आले. या प्रकरणाची चौकशी सहायक पोलिस आयुक्त मनोजकुमार यादव यांनी केली. यात हवालदार खाडे यांना कौटुंबिक टिप्पणी करून डिवचल्याने त्यांचा राग अनावर झाला आणि हा प्रकार घडल्याचे सांगत सहायक आयुक्तांनी खाडेंची पाठराखण केली. दरम्यान, खाडे यांनी शिवीगाळ करणे चुकीचे असल्याचे सांगत आता वाहतूक पोलिसांना चांगले वागण्याचे धडे दिले जाणार असल्याचेही ते म्हणाले.
अक्कलकोट रोड पाण्याच्या टाकीजवळ मंगळवारी (ता. ४) वाहतूक अंमलदार खाडे यांनी एका दुचाकीस्वाराला अडवून त्याला अश्लिल शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली. तत्पूर्वी, या रोडवरून जाणाऱ्या दोन दुचाकींना खाडे यांनी अडविले होते. त्यातील एकाच्या गाडीला ‘एचएसआरपी’ नंबरप्लेट नव्हती, तर दुसऱ्या दुचाकीला नंबरप्लेट नव्हता. त्यासंदर्भात संबंधित दुचाकीस्वाराकडे विचारणा सुरू असतानाच दुसऱ्या एका व्यक्तीने खाडे यांच्यावर कौटुंबिक टिप्पणी केली.
त्यावेळी राग अनावर झाल्याने खाडे यांनी शिवीगाळ, मारहाण केली. त्याठिकाणी दबा धरून बसलेल्या एकाने शिवीगाळीपूर्वीचा व्हिडिओ समोर न आणता एकच बाजू सोशल मिडियातून प्रसारित केली. यासंदर्भात बुधवारी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळावरील रिक्षा चालक संघटनेचे पदाधिकारी, रिक्षा चालकांकडे चौकशी केली. तसेच वाहतूक हवालदार खाडे व त्या दोन्ही दुचाकीस्वारांना बोलावून माहिती घेतली. त्यावेळी हा प्रकार समोर आल्याचेही सहायक पोलिस आयुक्त यादव यांनी सांगितले.
सहायक पोलिस आयुक्तांची खांदेपालट
सोलापूर शहरातील परिमंडळ- एकचे सहायक पोलिस आयुक्त प्रताप पोमण हे दोन-अडीच महिन्यांनी सेवानिवृत्त होणार आहेत. त्यांना आहे त्याच ठिकाणी राहण्याची इच्छा होती, पण त्यांची बदली नियंत्रण कक्षात करण्यात आली. त्याठिकाणी नव्याने बदलून आलेले सहायक पोलिस आयुक्त अरूण देवकर यांची नेमणूक केली आहे. दुसरीकडे वाहतूक शाखेचे सहायक पोलिस आयुक्त सुधीर खिरडकर यांच्याकडील जबाबदारी आता नवीन सहायक पोलिस आयुक्त मनोजकुमार यादव यांच्याकडे सोपविली आहे. श्री. खिरडकर यांच्यावर विशेष शाखेची जबाबदारी देण्यात आली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.