
सोलापूर : अक्कलकोट रस्त्यावरील ‘एमआयडीसी’तील सेंट्रल इंडस्ट्रीज या टॉवेल कारखान्याला रविवारी पहाटे आग लागून त्यात आठ जणांचा होरपळून मृत्यू झाला. मृतांमध्ये कारखान्याचे मालक आणि त्यांच्या कुटुंबातील तिघांचा समावेश आहे. चौदा तासांनी ही आग नियंत्रणात आली. आगीचे कारण समजू शकलेले नाही.