
solapur city police
sakal
सोलापूर : सोलापूर शहर पोलिस दलातील वाहतूक पोलिस अंमलदार संभाजी शिवाजी दोलतोडे (वय ३२, रा. अरविंद धाम, पोलिस वसाहत सोलापूर) यांचा झोपेत बेडवरून पडल्याने मृत्यू झाला आहे. त्यांचा मरणोत्तर पंचनामा केल्यावर ही बाब समोर आली आहे.
पोलिस नाईक चव्हाण यांनी समक्ष कळविले की, १२ ऑक्टोबर रोजी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात अकस्मात मयत दाखल झाले आहे. यात मयत संभाजी दोलतोडे यांचा मरणोत्तर पंचनामा करण्यासाठी मयताच्या पत्नीकडे चौकशी केली. त्यावेळी संभाजी बेडवर झोपले होते. ते पहाटे पाचच्या सुमारास झोपेतच बेडवरून खाली पडले. त्यावेळी त्यांना डोक्यामागील बाजूस जबर मार लागला होता. त्यानंतर त्यांना उलटी झाली होती. त्यांना तातडीने उपचारासाठी अश्विनी हॉस्पिटल येथे पहाटे साडेपाचच्या सुमारास दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.
मरणोत्तर पंचनामा पूर्ण करून मृतदेहाची उत्तरीय चाचणी करण्यात आली असून अंत्यविधीसाठी मृतदेह त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. शवविच्छेदन अहवालानंतर त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण, समोर येईल, असेही अधिकारी म्हणाले. त्याच्या अशा अचानक जाण्याने पोलिस दलातील त्यांच्या मित्रांनाही धक्का बसला आहे.
मयत अंमलदार खेळाडू; कुटुंबाचा भार त्यांच्यावरच
मयत पोलिस अंमलदार संभाजी दोलतोडे यांचे मूळगाव उपळाई खुर्द (ता. माढा) हे आहे. गोळा व थाळीफेक या खेळात ते अव्वल होते. व्यसन नसलेले संभाजी पोलिसांच्या आरोग्य तपासणीत स्वत:ला कोणताही आजार (बीपी, शुगर) नसल्याने ते आरोग्य तपासणी देखील करत नव्हते. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्यांच्यावरच होती. त्यांना दीड वर्षाची मुलगी व सहा वर्षांचा मुलगा आहे. त्यांच्या अचानक जाण्याने दोलतोडे कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अंत्यविधीसाठी दोलतोडे यांच्या गावी मोठी गर्दी होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.