डासांची गुणगुण थांबल्यास  झुडपेही होतील उदास 

राजेश रामपूरकर
Wednesday, 30 September 2020

तळ्यातील, नद्यांमधील अतिरिक्त गाळ साफ करून त्यातील नायट्रोजन पाणवनस्पतींना उपलब्ध करून देण्याचं काम हे डास करत असतात. डासांच्या जाण्याने नद्यांमध्ये काही ठिकाणी जिथे अतिरिक्त गाळ साचून राहतो अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजीव वाढतील. त्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होऊन अशा ठिकाणी राहणारे मासे मरतील. 

नागपूर :  डासाला उपद्रवी कीटक म्हणून संबोधण्यात येत असले तरी निसर्गाच्या साखळीतील महत्त्वाचा घटक आहे. कारण जवळपास सगळ्याच डासांच्या जातीतील नर झाडांमधून रस शोषून जिवंत राहतात. ज्या प्रक्रियेत ते विविध फुलांचे परागीभवन करतात. डास संपुष्टात आल्यास पृथ्वीवरील झाडे- झुडपे देखील उदास आणि असहाय्य होतील असे संशोधन पुढे आले आहे. 

काही प्रवासी पक्षी जेव्हा उन्हाळ्यासाठी दक्षिणेकडून उत्तरेकडे प्रवास करतात तेव्हा अलास्का सारख्या दलदली प्रदेशात जथे इतर काहीच उगवत नाही अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर तयार झालेले डासांचे ढग या पक्षांसाठी खात्रीशीर अन्न असते. डासांच्या जाण्याने प्रवासी पक्षांचे प्रवास कायमचे संपुष्टात येणार आहेत. कीटक शास्त्रज्ञ ब्रूस हॅरिसन ह्यांच्या मते डासांच्या जाण्याने टुंड्रा प्रदेशात घरटी करणाऱ्या पक्षांची संख्या ५० टक्क्यांनी कमी होऊ शकते.

ग्राहकांनो, मिठाई खरेदी करताय? मग आता ‘एक्स्पायरी डेट' बघूनच विकत घ्या; नवीन नियम होणार लागू  

तळ्यातील, नद्यांमधील अतिरिक्त गाळ साफ करून त्यातील नायट्रोजन पाणवनस्पतींना उपलब्ध करून देण्याचं काम हे डास करत असतात. डासांच्या जाण्याने नद्यांमध्ये काही ठिकाणी जिथे अतिरिक्त गाळ साचून राहतो अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजीव वाढतील. त्यामुळे पाण्यातील प्राणवायू कमी होऊन अशा ठिकाणी राहणारे मासे मरतील. शिवाय अतिरिक्त प्रमाणात नायट्रोजनसारखे पदार्थ साठल्याने तेथे नको तितक्या प्रमाणात शेपाळ उगवेल आणि पाण्यातील पान वनस्पती मरतील. इतर सर्व जीव जंतू प्रमाणे माणूस या पृथ्वीवर एक प्रवासी म्हणून आला आहे. हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. आपल्या जीवनाचा प्रवास संपल्यावर निमूटपणे इथून निघून गेलं पाहिजे, असे मत प्राणिशास्त्र विभागाचे प्रा. भूषण भोईर यांनी सांगितले. 

रशिया, कॅनडावर प्रतिकूल परिणाम 

डासांच्या जाण्याने पृथ्वीवरील झाडे झुडपे देखील उदास आणि असहाय्य होतील. कारण, जवळपास सगळ्याच डासांच्या जातीतील नर झाडांमधून रस शोषून जिवंत राहतात. ज्या प्रक्रियेत ते विविध फुलांचे परागीभवन करतात. उत्तरी कॅनडा, रशिया सारख्या देशांमध्ये डासांचा परागीभवन प्रक्रियेत मोठा वाटा आहे. डासांच्या जाण्याने सगळ्यात जास्त वाईट परिणाम रशिया आणि कॅनडा सारख्या देशांमध्ये होऊ शकतो. प्रा. भूषण भोईर  प्राणिशास्त्र विभाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Trees and Shrubs of The Earth are Sad if Mosquitoes are Extinct