तृतीयपंथीय कल्याण मंडळ येत्या वीस दिवसांत - अजित पवार

सकाळ न्यूज नेटवर्क
बुधवार, 8 जानेवारी 2020

राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले बहुप्रतिक्षित तृतीयपंथीय कल्याण मंडळ येत्या २० दिवसांत स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते.

मुंबई - राज्यातील तृतीयपंथीयांसाठी काम करणाऱ्या तज्ज्ञांचा समावेश असलेले बहुप्रतिक्षित तृतीयपंथीय कल्याण मंडळ येत्या २० दिवसांत स्थापन करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिले आहेत. तृतीयपंथीयांच्या विविध प्रश्नांबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत पवार बोलत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘तृतीयपंथीय समाज घटकांची सर्वांगीण उन्नती व्हावी व त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणले जावे. या मंडळामार्फत तृतीयपंथीयांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देऊन त्यांचा आर्थिक व सांस्कृतिक विकास घडवून आणण्यासाठी हे कल्याण मंडळ कार्य करणार आहे. तृतीयपंथीयांच्या समस्या सोडविण्यासाठी या मंडळामार्फत मराठी भाषेत हेल्पलाईन सुरु करण्यात येईल. त्यांचा सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकास करण्यासाठी या कल्याण मंडळामार्फत प्रयत्न केले जाणार आहेत,’’ असे पवार म्हणाले. 

उपजीविकेची शाश्वती नसल्याने तृतीयपंथी समुदायाला वेश्‍यावृत्ती, भिक्षा, धार्मिक समारंभप्रसंगी लोकांना आशीर्वाद देणे आदी मार्गाचा आश्रय घ्यावा लागतो. तृतीय पंथीयांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी राज्य आणि विभागीय स्तरावर तृतीयपंथीय कल्याण मंडळ स्थापन करण्याची घोषणा करण्यात आली होती.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Trilateral Welfare Board in the coming twenty days