
देहू : टाळ मृदंगाचा गजर आणि तुकाराम, तुकाराम नामघोषात रविवारी (ता.१६) अवघी देहूनगरी दुमदुमली. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा त्रिशतकोत्तर अमृतमहोत्सवी अर्थात ३७५ वा बीज सोहळा श्री क्षेत्र देहूच्या इंद्रायणी नदीच्या तीरावर मोठ्या भक्तिभावाने उत्साहात आणि परंपरेनुसार झाला. वैकुंठगमन सोहळ्याची वेळ जवळ येताच दुपारी साडेबारा वाजता भाविकांनी नांदुरकीच्या वृक्षावर पुष्पवृष्टी केली. राज्याच्या कानाकोपऱ्यातून चार लाख भाविक उपस्थित होते.