मिरज येथील जुळ्या भावांचा कारनामा! वडिल नाहीत, कंपनीत दरमहा ५०,००० पगार आहे म्हणून केले विवाह; १५ दिवसांतच हुंड्यासाठी पत्नींना मारहाण, जीवे मारण्याचाही प्रयत्न

मुलांच्या सासरच्यांनी दोन्ही जुळी मुले कंपनीत कामाला असून त्यांना दरमहा ५० हजार रुपये पगार असल्याचे सांगितले. मुलींच्या वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मिरज (जि. सांगली) येथील अजय चिंतामणी व विजय चिंतामणी यांच्याशी मुलींचा विवाह थाटात लावून दिला. १० फेब्रुवारीला विवाह झाला होता. १०-१५ दिवसांतच हुंड्यासाठी मुलींच्या सासरच्यांनी दोघींनाही बेदम मारहाण केली.
marriage
marriagesakal
Updated on

सोलापूर : मुलांच्या सासरच्यांनी दोन्ही जुळी मुले कंपनीत कामाला असून त्यांना दरमहा ५० हजार रुपये पगार असल्याचे सांगितले. मुलींच्या वडिलांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून मिरज (जि. सांगली) येथील अजय चिंतामणी व विजय चिंतामणी यांच्याशी मुलींचा विवाह थाटात लावून दिला. १० फेब्रुवारीला विवाह झाला होता. १०-१५ दिवसांतच हुंड्यासाठी मुलींच्या सासरच्यांनी दोघींनाही बेदम मारहाण केली. एकीचा गळा दाबून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. यात सात जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून चौघांना अटक केली आहे.

सोलापुरातील देगाव नाका परिसरातील बल्लारी चाळ येथील कुमार केंचप्पा वरेलूर यांच्या दोन्ही मुलींचा विवाह मिरज (जि. सांगली) येथील अजय चिंतामणी व विजय चिंतामणी या जुळ्या भावांसमवेत १० फेब्रुवारीला पार पडला. मात्र, विवाहानंतर आठ–दहा दिवसांतच मुलींनी वडील कुमार वरेलूर यांना फोन करून पती, त्यांचे मामा, सासू असे सर्वजण खूप छळ करीत असल्याचे सांगितले. पती अजय चिंतामणी, विजय चिंतामणी, सासू गुणवंता चिंतामणी, पतीचे मामा वीरस्वामी तुपदळे, आकाश चिंतामणी यांनी हुंड्यासाठी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. प्रेमा या नवविवाहितेचा गळा दाबून तिला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, अशी फिर्याद मुलींचे वडील कुमार वरेलूर यांनी पोलिसांत दिली.

त्यावरून बसवराज नवले, प्रेमा नवले (दोघेही रा. सोलापूर), वीरस्वामी तुपदळे, आकाश चिंतामणी, गुणवंता चिंतामणी, विजय चिंतामणी, अजय चिंतामणी (सर्वजण रा. मिरज, जि. सांगली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. घटनेचे गांभीर्य पाहून सहायक पोलिस निरीक्षक जाधव यांनी मिरज गाठले. तेथून दोन्ही मुलींचे पती, सासू गुणवंता चिंतामणी आणि पतीचा मामा वीरस्वामी तुपदळे यांना अटक करून सोलापुरात आणले. उद्या (गुरुवारी) त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.

विवाहात आठ लाखांचा खर्च, तरीही...

दोन्ही मुलींच्या विवाहात कुमार वरेलूर यांनी रुखवत, संसारोपयोगी साहित्य, बेड, लोखंडी कपाट, घड्याळ, चांदीच्या अंगठ्या असा आठ लाख रुपयांचा खर्च केला. मुलींना चांगले सासर मिळाले, सख्ख्या बहिणी एकाच घरात सुखाने नांदतील म्हणून फिर्यादी कुमार वरेलूर व कुटुंबातील सर्वजण खूश होते. मात्र, विवाहापूर्वी जावयांनी खोटे सांगून लग्न केल्याचेही फिर्यादीत नमूद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com