NCP Political Crisis: राष्ट्रवादीच्या दोन्ही गटातील नेत्यांमध्ये ट्विटर वॉर; म्हणाले 'तुमचा कार्यकर्ता....'

या ट्विटर वॉरची चर्चा सध्या सोशल मिडियावर जोरदार रंगल्याचं दिसून येत आहे
NCP Political Crisis
NCP Political CrisisEsakal

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यापासून अजित पवार गटातील आणि शरद पवार गटातील नेते ऐकमेंकावर आरोप-प्रत्यारोप करताना दिसून येतात. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा गटा)चे नेते आमदार अमोल मिटकरी व राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात ट्विटर वॉर रंगल्याचं दिसून येत आहे.

आमदार मिटकरींनी गेल्या काही दिवसांपासून एका नंबरवरून एक व्यक्ती फोन करून अश्लील शिवीगाळ करत असल्याची माहिती त्यांनी ट्विटरवर दिली आहे. समोरील व्यक्ती आमदार रोहित पवार व जितेंद्र आव्हाड यांचे नाव घेत असल्याचा दावा मिटकरींनी केला आहे. ट्विटरवर संबधित व्यक्तीचा नंबर शेअर करत, आमदार रोहित पवार व जितेंद्र आव्हाड या दोघांनाही टॅग करत या व्यक्तीला समज देण्याबाबत मिटकरींनी म्हटलं आहे.

NCP Political Crisis
Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून CM शिंदेंनी बोलवली सर्वपक्षीय बैठक; उद्धव ठाकरे उपस्थित राहणार?

यावर आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही 'आमच्या दोघांचा काय संबध, उगाच आम्हाला जोडू नका. आमचे कार्यकर्ते देतील ते नाव घेऊन देतील', अशी तिखट प्रतिक्रिया ट्विटरच्या माध्यमातून मिटकरी यांच्या ट्विटला उत्तर दिलं आहे.

NCP Political Crisis
Maratha Reservation : मनोज जरांगे आंदोलन आणखी तीव्र करणार! सरकारशी चर्चा फिस्कटली, आजपासून औषध-पाणी बंद

त्यावर मिटकरींनी पून्हा जितेंद्र आव्हाड यांना टॅग करून, 'साहेब बहुतेक आपण नीट वाचले नाही. आपले नाव घेऊनच शिवीगाळ झाली आहे. कदाचित तुमचे कार्यकर्ते नसतीलही पण असतील तर समज द्या. तसे तुमचे कार्यकर्ते खूप सज्जन आहेत ते अशी काही शिवीगाळ करतील असं वाटत नाही. आपण "संविधानाला" मानता म्हणून आपल्याला विनंती केली आहे'. असे ट्विट करत मिटकरींनी जितेंद्र आव्हाडांना खोचक टोला लगावला आहे. दोघांच्या या ट्विटर वॉरची चर्चा सध्या सोशल मिडियावर जोरदार रंगल्याचं दिसून येत आहे.

NCP Political Crisis
Shiv Sena : शिवसेना आमदारांच्या अपात्रतेवर 'या' दिवसापासून मॅरेथॉन सुनावणी; निकाल कधी अन् काय लागणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com