दोन दिवसांत भाजपने दुसरा विषय घेतला हाती; एमपीएससी परीक्षेवरून सरकारची कोंडी

MPSC student
MPSC student

मुंबई : अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी विधीमंडळात मनुसख हिरेन प्रकरणावरुन एपीआय सचिन वाझे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी भाजपने लावून धरली होती. त्यानंतर आज दुसऱ्याच दिवशी MPSCची परीक्षा पुढे ढकलल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात राज्यातील विविध शहरांमध्ये विद्यार्थी रस्त्यावर उतरले असून रास्ता रोको, घोषणाबाजी आणि सरकारच्या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांचं हे आंदोलन भाजपप्रणित असल्याची चर्चा सुरु आहे. कारण या आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर भाजपच्या विविध नेत्यांनी यावरुन सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.  

पुणे, औरंगाबाद, अहमदनगर, नागपूर, कोल्हापूर, वाशिम, परभणी, अमरावती या शहरांमध्ये विद्यार्थी एमपीएससी परीक्षा रद्द केल्याच्या सरकारच्या निर्णयाविरोधात रस्त्यावर उतरले आहेत. दरम्यान, पुण्यात झालेल्या आंदोलनात भाजप नेते गोपीचंद पडळकर हे देखील सहभागी झाले होते. त्याचबरोबर भाजप नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील, पंकजा मुंडे, प्रवीण दरेकर यांसह विविध भाजपाच्या नेत्यांनी सरकारच्या या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. 

परीक्षेला स्थगिती देण्याचा निर्णय तत्काळ रद्द करावा! - फडणवीस  

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय चुकीचा - पंकजा मुंडे 
 

राज्यात झालाय शिक्षणाचा खेळखंडोबा, विद्यार्थ्यांची दैना - अतुल भातखळकर
 

शिक्षणाच्या प्रातांतल्या प्रश्नांची समज नसलेलं ठाकरे सरकार - सुनिल देवधर

एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणं विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक - चंद्रकांत पाटील

एमपीएससी परीक्षा  पुढे ढकलण्याचा निर्णय अन्यायकारक -  बबनराव लोणीकर

वारंवार एमपीएससी परीक्षा पुढे ढकलणे सरकारचा नाकर्तेपणा - जगदीश मुळीक

परीक्षा घेता आल्या असत्या पण....- प्रविण दरेकर
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com