Students
sakal
पुणे - राज्यात इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असलेल्या एकल मातांच्या मुलांची संख्या दोन लाख २३ हजार ४२ इतकी आहे. यात सर्वाधिक १४ हजार ३६७ मुले नाशिक जिल्ह्यात, त्यापाठोपाठ १३ हजार ७७४ मुले जळगाव जिल्ह्यात आहेत, तर पुणे जिल्ह्यात एकल मातांची एकूण पाच हजार ९५९ मुले बारावीपर्यंतचे शिक्षण घेत असल्याची माहिती समोर आली.