दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी सेनेकडून दोन पत्र, BMC सुद्धा संभ्रमात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी सेनेकडून दोन पत्र, BMC सुद्धा संभ्रमात

दसरा मेळाव्याच्या परवानगीसाठी सेनेकडून दोन पत्र, BMC सुद्धा संभ्रमात

शिवसेनेला नवसंजीवनी देणारा शिवसेनेचा दसरा मेळावा घेण्यासाठी शिवसेनेने मुंबई महापालिकेला दोन पत्र लिहली आहेत. परंतु या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याबद्दलचा निर्णय मुंबई महापालिकेने थांबवून ठेवला आहे. गणेशोत्सव झाल्यानंतरच मेळाव्याबद्दलचा निर्णय घेऊ असं स्पष्टीकरण मुंबई महापालिकेचे सहाय्यक आयुक्त सपकाळे यांनी दिले आहे.

शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घेण्याकरता जी नॉर्थ विभागाला दोन वेळा पत्र देऊनही मुंबई महापालिकेने अर्ज थांबवून ठेवला आहे. सद्यपरिस्थितीत गणेश उत्सवाच्या दरम्यान पालिकेतील सर्व स्टाफ प्रशासनिक बाबी आणि इतर तयाऱ्यांमद्धे गुंतला असल्यामुळे दसरा मेळाव्याच्या परवानगीबाबत अद्याप निर्णय होऊ शकलेला नाही, असे स्पष्टीकरण मुंबई महापालिकेकडून देण्यात आलेलं आहे.

हेही वाचा: अग्रलेख : ये जोड टुटेगा नही

शिवसेनेच्या परंपरेप्रमाणे शिवाजी पार्क मैदानावर दसऱ्याच्या दिवशी शिवसेनेचे पक्षप्रमुख सभा घेत शिवसैनिकांना आपल्या भाषणातून नवसंजीवनी आणि दिशा देतात. मात्र, यंदाच्या वर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा शिवाजी पार्कवर होणार का? याबाबत संभ्रम आहे.

एकेकाळचे निष्ठावंत शिवसैनिक आणि ज्येष्ठ नेते असलेले एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रिपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. शिवसेनेचे 40 आमदार आणि 12 खासदार आता शिंदे गटात सामील झाले आहेत, त्यामुळे शिवेसेनेला जोरदार धक्का बसला आहे. या धक्क्यातून पक्षाला सावरण्यासाठी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे राज्यभर दौरे करणार आहेत, अनेक दौरे याअगोदरच झाले. याचाच एक भाग म्हणून शिवसैनिकांमध्ये उर्जा भरण्यासाठी यंदाच्या दसरा मेळाव्याचं महत्वं वाढलं आहे.

Web Title: Two Letters From Shivsena For Permission For Dusara Melava At Shivaji Park Decision On Hold From Mumbai Munisipal Corporation

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..