Barsu Refinery Protest : उद्योगमंत्री अन् शरद पवार भेटीमध्ये काय झालं? सामंत म्हणाले…

Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics
Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics

रत्नागिरी जिल्हायतील बारसू रिफायनरीला होत असलेल्या विरोधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहेत. या दरम्यान उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आज (२६ एप्रील) राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. या भेटीनंतर झालेल्या चर्चेबद्दल त्यांनी माध्यमांना सविस्तर माहिती दिली आहे.

उदय सामंत म्हणाले की, ही भेट बारसूच्या पार्श्वभूमीवर ठरलेली नव्हती तर चार दिवस अगोदर ही भेट ठरली होती. शरद पवार हे अखील भारतीय नाट्य परिषदेचे विश्वस्त आहेत आणि त्यांनी मला देखील या संस्थेचा विश्वस्त केलं आहे. नाट्य परिषदेच्या पंचवार्षीक निवडणूकीत निवडून आलेले जे पॅनलीस्ट आहेत यामध्ये दोन जागी वाद होते. हे वाद संपवण्यासाठी निवडूक अधिकारी, शरद पवार आणि मी अशी ही बैठक होती.

शरद पवार भेट रद्द झाल्याबद्दल बोलताना सामंत म्हणाले की, आज सकाळपासून माझी तब्यत बिघडली असल्याने मी शरद पवारांना भेटणार नाही अशी चुकीची माहिती देण्यात आली होती असेही उदय सामंतानी यावेळी स्पष्ट केलं.

Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics
हॉल तिकीटवर तारीख आजची, पण परीक्षा तर कालच झाली! नाशिक, नागपूरात बीएड प्रवेश परीक्षेवेळी गोंधळ

पुढे सामंत म्हणाले की, जरी ही नाट्य परिषदेपुरती बैठक असली तरी त्यांना (शरद पवारांना) बारसूमधील आजची परिस्थिती काय आहे, तसेच काल प्रतिबंधात्मक कारवाई म्हणून अटक केलेल्या महिलांना देखील सोडून देण्यात आलं असल्याचं मी सांगितलं आहे, असे सावंत यावेळी म्हणाले.

उद्या पुन्हा आंदोलकांसोबत बैठक

कुठल्याही परिस्थीतीत शासनाने शेतकऱ्यांबरोबर चर्चा केली पाहीजे यावर सगळ्यांचं एकमत आहे. नागरिकांनी गैरसमज करून घेण्याची गरज नाही. उद्या देखील जिल्हा प्रशासनाने तेथील ३०० ते ३५० प्रमुख लोकांबरोबर बैठक आयोजित केली आहे असे उदय सामंत म्हणाले.

या रिफायनरीसाठी जसे विरोधक आहेत तसेच समर्थक देखील आहेत. कारण जे सर्वेक्षण आपण म्हणतोय ते मातीच टेस्टींग होतंय. ते झाल्यानंतर प्रकल्प येथे आणायचा की नाही ते कंपनी ठरवणार आहे. उद्या आम्ही लोकांना प्रजेंटेशन करून याबद्दलचे गैरसमज दूर केले जातील याबद्दल शरद पवारांना या बैठकीत माहिती दिल्याचं सावंत म्हणाले.

Uday samant Meet sharad pawar amide Ratnagiri Barsu Refinery Protest Maharashtra Politics
Mukesh Ambani : निष्ठावान सहकाऱ्याला अंबानींचं जम्बो गिफ्ट! दिलं १५०० कोटींचं घर

पवारांची भूमीका काय?

बारसू रिफायनरी बद्दल पवारांनी समर्थन दर्शवलं आहे का? या प्रश्नावर बोलताना सामंत म्हणाले की, शरद पवार हे महाराष्ट्र राज्याचे चार वेळा मुख्यमंत्री होते. त्यांचं मत मी सांगू शकत नाही. पण उद्योगमंत्री म्हणून आठ दिवसात कशा प्रकारे बैठका घेतल्या आहेत याबद्दल नाट्य परिषदेची बैठक संपल्यानंतर मी शरद पवारां माहिती दिली आहे असेही सामंत म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com