Udayanraje Bhosale : जितेंद्र आव्हाडांवर कठोर कारवाई झालीच पाहिजे; प्रभू श्रीरामांवरील वादग्रस्त वक्तव्यानंतर उदयनराजे आक्रमक

प्रभू श्रीरामचंद्रांवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केलेले वक्तव्य हे एक प्रकारची सामाजिक विकृती आहे.
Udayanraje Bhosale vs Jitendra Awhad
Udayanraje Bhosale vs Jitendra Awhadesakal
Summary

छत्रपती शिवरायांचे विचार कोणी आचरणात आणले असतील, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले आहेत.’’

सातारा : प्रभू श्रीरामचंद्रांवर राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awad) यांनी केलेले वक्तव्य हे एक प्रकारची सामाजिक विकृती आहे. अशी वक्तव्य करणाऱ्यांवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांनी केली.

जलमंदिर येथे अयोध्या येथून आलेल्या प्रभू रामचंद्राच्या (Shriram) अक्षदा कलशाच्या पूजनानंतर पत्रकारांशी संवाद साधला. उदयनराजे म्हणाले, ‘‘महापुरुषांवर अशा पद्धतीने वक्तव्य करणे ही एकप्रकारची सामाजिक विकृती आहे. सर्व धर्मांमध्ये संत आणि महापुरुष असून, त्यांनी त्यांच्या धर्माला न्याय देण्याचा आणि वेगळे विचार मांडण्याचा नेहमीच प्रयत्न केला.

Udayanraje Bhosale vs Jitendra Awhad
Ajit Pawar : सांगली जिल्ह्यात जयंत पाटलांचा 'करेक्ट कार्यक्रम'; कट्टर समर्थकाचा अजितदादा गटात जाहीर प्रवेश

जितेंद्र आव्हाड काय म्हणाले, याच्याशी मला देणे- घेणे नाही. मात्र, ही एकप्रकारची विकृती असून, अशाप्रकारांच्या विधानावर राज्य शासन व केंद्र शासनाने कठोर कायदा करून कारवाई केली पाहिजे. हिंदू धर्म हा जगण्याचा मार्ग आहे. छत्रपती शिवरायांनी सर्वधर्मसमभाव ही संकल्पना रुजवली आणि आचरणात आणली. कधीही त्यांनी दुसऱ्या धर्माचा भेदभाव केला नाही. मात्र, असा भेदभाव सध्या राजकारणामध्ये आणून वेगळा पायंडा पाडण्याचा प्रयत्न होत आहेत.

Udayanraje Bhosale vs Jitendra Awhad
Loksabha Election : 'लोक शरद पवारांच्या पाठीशी, माढ्यात निश्चित परिवर्तन घडेल'; NCP नेत्याचं थेट महायुतीलाच चॅलेंज

छत्रपती शिवरायांचे विचार कोणी आचरणात आणले असतील, तर ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले आहेत.’’ दरम्यान, मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भात ते म्हणाले, ‘‘राज्य शासनाकडून योग्य ती पावले उचलली जात आहेत. यासंदर्भात तत्कालीन राज्यकर्त्यांनी चुकीची धोरणे राबविल्यामुळे मराठा समाजाला अद्याप आरक्षण मिळू शकलेले नाही.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com