Udayanraje Bhosale
Udayanraje Bhosaleesakal

मनात विकृती असणाऱ्यांनी संभाजी महाराजांची बदनामी केलीय : उदयनराजे

Summary

छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजही श्रेष्ठ होते; पण..

सातारा : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) आपल्या हटके स्टाईलमुळं ओळखले जातात. आपली डायलॉगबाजी, कॉलर उडवण्याची स्टाईल आदींमुळं उदयनराजे कार्यकर्त्यांमध्ये खूपच प्रिय आहेत. मात्र, हेच उदयनराजे काल पुन्हा भावूक झाल्याचं पहायला मिळालं. छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणेच छत्रपती संभाजी महाराजही (Chhatrapati Sambhaji Maharaj) श्रेष्ठ होते; पण कारण नसताना त्यांना बदनाम करण्यात आलं, अशा शब्दांत खासदार उदयनराजेंनी त्यांच्या मनातील खदखद व्यक्त केली आणि ते भावूक झाले.

मनात विकृती असणाऱ्यांनी संभाजीराजेंची बदनामी केलीय. धाडस असेल तर अशा लोकांनी कोणत्याही व्यासपीठावर येऊन माझ्यासोबत उघडपणे चर्चा करावी, असं थेट आव्हान त्यांनी दिलं. उदयनराजे यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात शिवराज्याभिषेक नाट्य आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना उदयनराजेंनी छत्रपती संभाजीराजेंबद्दल भाष्य केलंय. कोविड नियमांमधून थोडी सुट मिळाल्यामुळं यंदा उदयनराजेंचा वाढदिवस (Udayanraje Birthday) मोठ्या थाटामाटात साजरा केला जातोय.

Udayanraje Bhosale
आठ पालिकांच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; आमदार-खासदारांची प्रतिष्ठा पणाला

दरम्यान, एका कार्यक्रमात उदयनराजेंनी संभाजी महाराजांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्यावर झालेल्या बदनामीचा आणि षडयंत्रांचा निषेध नोंदवला. साताऱ्यातील पोवई नाका येथे शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या (Chhatrapati Shivaji Maharaj) पुतळ्याला अभिवादन करून छत्रपती उदयनराजेंच्या हस्ते महाराजांची महाआरती करण्यात आली. यावेळीही बोलताना उदयनराजे भावूक झाले होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com