Uddhav Thackeray: तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली? उद्धव यांचा मोदींना सवाल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray, Narendra Modi

Uddhav Thackeray: तुम्हाला राखी बांधायला हीच बाई मिळाली? उद्धव यांचा मोदींना सवाल

मुंबई - ज्येष्ठ नेते एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतून बंड केल्यामुळे संपूर्ण शिवसेना अडचणीत आली आहे. आमदारांपाठोपाठ खासदार देखील शिंदे गटात गेल्याने शिवसेनेच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. यातून मार्ग काढत उद्धव ठाकरे ऍक्शन मोडमध्ये आले आहेत. आज ते पदाधिकाऱी मेळाव्यात शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना संबोधित करत आहेत. यावेळी त्यांनी वाशीमच्या खासदार भावना गवळी यांच्यावर जोरदार टीका केली. (Uddhav Thackeray news in Marathi)

हेही वाचा: Uddhav Thackeray : मुंबई पालिकेसाठी उद्धव ठाकरेंची टाईट फिल्डिंग; भाषणातून...

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी केलं म्हणून आज तुमचं सरकार आज वळवळतंय....कोरोनामध्ये मला माझ्या जनतेचे प्राण प्रिय होते. उत्तर प्रदेश आणि इतर ठिकाणी जे घडलं ते महाराष्ट्रात झालं नाही. कोर्टानं आपलं कौतूक केलं. मुंबई ज्याप्रकारे सांभाळली त्याचं कौतूक कमळाबाईला नाही तर परदेशातील लोकांना आहे. यांचं आता असं झालं की, कुणी काही काम केलं की, लगेच भ्रष्टाचार झाला असे बोंबलून टाकायचं. लोकांना बदनाम करुन टाकायचे.

खासदार भावना गवळी यांच्यावर टीका करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, ज्यांच्यावर तुम्ही भ्रष्टाराचाराचे आरोप करत आहात त्यांना तुम्ही क्लिन चीट देत आहात. मला पंतप्रधानाचे आश्चर्य वाटते, ज्या बाईवर आरोप केले तिच बाई मिळाली का तुम्हाला राखी बांधायला, असा सवालही उद्धव यांनी उपस्थित केला.

माझं आव्हान आहे की, संपूर्ण देशात महाराष्ट्रात जे इन्फ्रास्ट्रक्चर उभे केले ते कुणीही केले नाही. कोरोनाच्या परिस्थितीत जे काम केले ते कौतूकास्पद होते. कोरोनाला केंद्राची अनास्था जबाबदार असल्याचा एक अहवाल समोर आला, असं उद्धव म्हणाले.

Web Title: Uddhav Thackeray Bhavana Gavali Bjp Narendra Modi

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Shiv SenaUddhav Thackeray