esakal | मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या ममता बॅनर्जींना विजयाबद्दल शुभेच्छा

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray and mamata banerjee
मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिल्या ममता बॅनर्जींना विजयाबद्दल शुभेच्छा
sakal_logo
By
प्रमोद सरवळे

औरंगाबाद: पश्चिम बंगालच्या विधानसभेचे निकाल काही वेळात स्पष्ट होतील. पण सध्या ममता बॅनर्जींचा तृणमूल पक्ष २०० पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेऊन विजय निश्चित केला आहे. त्यामूळे भाजपाच्या मोठ्या प्रचार यंत्रणेला धक्का देत ममदादीदींनी त्यांचा विजय निश्चित केला आहे.

निश्चित झालेल्या विजयामुळे ममतादीदींना राजकीय क्षेत्रातील मोठ्या नेत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत असल्याचे दिसत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही ममतादीदींना फोन करून विजयाबद्दल अभिनंदन केले आहे. यापूर्वी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांनी ममदा बॅनर्जींना विजयाबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा: संजय राऊत म्हणतात, बंगालच्या वाघिणीचा जखमी असतानाही विजय

पश्चिम बंगालमध्ये सध्या तृणमूल काँग्रेसने २०७ जागांवर आघाडी घेतली आहे. तर भाजप ८२ ठिकाणी आघाडीवर आहे. थोड्याच वेळात ममता बॅनर्जी पत्रकार परिषद घेणार आहेत.