आमची लढाई भाजपच्या 'मी' पणाविरुद्ध : उद्धव ठाकरे

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

मी पुन्हा येईन, असे म्हणण्यापेक्षा मी जाणारच नाही, असे म्हणावे लागेल. तुम्ही माणसे फोडून राजकारण करत आहात. आम्ही चर्चा करून करत आहोत. भाजपच्या मी पणाविरुद्ध आमची लढाई सुरु झाली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

मुंबई : मी पुन्हा येईन, असे म्हणण्यापेक्षा मी जाणारच नाही, असे म्हणावे लागेल. तुम्ही माणसे फोडून राजकारण करत आहात. आम्ही चर्चा करून करत आहोत. भाजपच्या मी पणाविरुद्ध आमची लढाई सुरु झाली आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, दिवाकर रावते, मिलिंद नार्वेकर उपस्थित होते. तसेच राष्ट्रवादीचे प्रमुख नेते जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, हसन मुश्रीफ, दिलीप वळसे पाटील हेही यावेळी उपस्थित होते. अजित पवार यांनी भाजपसोबत जाऊन उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर ही प्रतिक्रिया देण्यात आली आहे.

उद्धव ठाकरे म्हणाले, की हरियानात तुम्ही काय केले. मी पणाविरुद्ध आमचा लढा सुरु झाला आहे. रात्रीच खेळ करून सत्ता मिळत नसते. पवारसाहेब आपण एकत्र आलो आहोत. यापुढे निवडणुका घेऊन नका. पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केल्यासारखा महाराष्ट्रावर करण्यात आला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav Thackeray criticize bjp