Uddhav Thackeray : अमेरिकेत विकत घेतलेल्या लोकांसमोर ज्ञान पाजळणार, पण…; मणिपूर मुद्द्यावरून ठाकरे PM मोदींवर बरसले!

Uddhav Thackeray criticized PM Modi US visit over the issue of violence in Manipur Maharashtra Politics
Uddhav Thackeray criticized PM Modi US visit over the issue of violence in Manipur Maharashtra Politics

मणिपूर येथे मागील काही दिवसांपासून हिंसाचार सुरू आहे. या हिंसाचार थांबवण्यासाठी सरकराकडून प्रयत्न केले जाता आहेत. यादरम्यान उद्धव ठाकरेंनी मणिपूर येथे सुरू असलेल्या हिंसाचारावरून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला आहे. आज, १८ जून रोजी झालेल्या शिवसेनेच्या महाशिबीरातून पंतप्रधान मोदींच्या आगामी अमेरिका दौऱ्यावर देखील त्यांनी जहरी टीका केली.

उद्धव ठाकरे म्हणाले की, सत्तेची मस्ती आम्ही उतरवू शकतो, हा तुमचा सत्तेचा फुगलेला फुगा फोडायला आम्हाला वेळ लागणार नाही असा इशारा उद्धव ठाकरे यांनी भाजपला दिला. एवढीच तुमची मस्ती दाखवायची असेल तर मणिपूरमध्ये जा आणि दाखवा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स अधिकारी पाठवा, जातायत का बघा आणि गेले तर परत येतायत का ते बघा. तिकडे लोक त्यांना जाळून टाकतील. तिकडे लोक पेटलेली, पिसाळलेली आहेत. अमित शाहांना देखील कोणी जुमानत नाहीये, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray criticized PM Modi US visit over the issue of violence in Manipur Maharashtra Politics
Shiv Sena : 'छापखान्यातून गायब झालेले ८८ हजार कोटी महाराष्ट्रातील सत्तासंघर्षात वापरले?' राऊतांचा गंभीर आरोप

...तर मणिपूर शांत करून दाखवा...

उद्धव ठाकरे पुढे बोलताना म्हणाले की, अमित शाहांनी काय केलं मणिपूरमध्ये जाऊन?.मला कळलं की पंतप्रधान मोदी अमेरिकेत चालले आहेत, पण मणिपूरमध्ये जायला तयार नाहीयेत. विश्वगुरू? अमेरिकेत विकत घेतलेल्या लोकांसमोर तुम्ही तुमचं ज्ञान पाजळणार , माझ्या देशातील एक राज्य पेटलं आहे. अरे तुम्ही रशिया-युक्रेनचं युद्ध थांबवलं ही भाकड कथा सांगितली. ही भाकड कथा खरी करायची असेल तर मणिपूर शांत करून दाखवा.

पहिल्यांदा मोदींनी मणिपूरमध्ये फक्त जाऊनच दाखवावं. मग त्यांच्यानंतर लोक त्यांचं ऐकतात की नाही ते बघतील, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

Uddhav Thackeray criticized PM Modi US visit over the issue of violence in Manipur Maharashtra Politics
Aditya Thackeray : 'त्या' जाहिरातीची धास्ती! 'वर्धापनदिनाआधीच शिवसेनेला दिल्या शुभेच्छा'; आदित्य ठाकरेंचं वर्मावर बोट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com