esakal | आमदार स्थानिक निधीत वाढ, आता मतदारसंघातील कामे होणार का?
sakal

बोलून बातमी शोधा

uddhav thackeray

आमदार स्थानिक निधीत वाढ, आता मतदारसंघातील कामे होणार का?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

मुंबई : राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकास निधीत (mla fund) वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांच्या विकास निधीत १ कोटी रुपयांची वाढ करण्यात येणार आहे. या निधीतून आमदारांना मतदारसंघातील विकास काम करता येणार आहेत.

हेही वाचा: 'चंद्रकांतदादांनी संयम राखला असता तर शिवसेनेचे आमदार भाजपसोबत गेले असते'

सध्या आमदारांचा विकास निधी ३ कोटी रुपये आहे. त्यात १ कोटीची वाढ करून तो ४ कोटी करण्यात आला आहे. या निधीतून आमदारांना मतदारसंघातील विकास कामे करता येतात. शाळा, अंगणवाडी, सार्वजनिक शौचालय, स्मशानभूमी यासारखी विकास कामे करता येतात. पण, लोकप्रतिनिधी एकदा निवडून आल्यानंतर मतदारसंघाकडे दुर्लक्ष करतात, असा आरोप केला जातो. तसेच आमदारकीच्या कार्यकाळात नेत्याने कामे केले नाहीत, असाही आरोप होतो. निधी कमी असल्याची ओरड आमदारांकडून केली जाते. त्यामुळेच राज्य सरकारने निर्णय घेत आमदारांच्या स्थानिक निधीमध्ये १ कोटी रुपयांची वाढ करून ती ४ कोटी केलेली आहे. पण, निधी वाढवून मिळाल्यानंतर आता खरंच तितक्याच क्षमतेने विकासकामे केली जाणार आहेत का? असाही प्रश्न उपस्थित होतो.

आमदारा निधी करण्यात येणाऱ्या कामात शौचालयांचे बांधकाम, व्यायामशाळांचे बांधकाम, स्मशानभूमीची कामे, बसथांबा बांधकाम, अंगणवाडी केंद्र बांधकाम या कामांचा समावेश असतो.

loading image
go to top