ठाकरे सरकार फडणवीसांना आणखी एक धक्का देणार ?

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 12 जानेवारी 2020

ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. फडणवीसांनी जाहीर केलेल्या योजनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार असल्याचं कळतंय.

मुंबई : महाविकासआघाडीचे सरकार सत्तेत आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपसह माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एकामागोमाग एक धक्के देण्यास सुरवात केली. त्यांनी फडणवीस यांनी केलेल्या अनेक नियुक्त्या आता रद्द करण्यास सुरवात केली आहे.  

ठाकरे सरकार देवेंद्र फडणवीसांना आणखी एक धक्का देण्याच्या तयारीत आहे. फडणवीसांनी जाहीर केलेल्या योजनेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संलग्न असलेल्या स्वयंसेवी संस्था अर्थात एनजीओंच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी होणार असल्याचं कळतंय.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

योजनांचा आर्थिक लाभ घेतलेल्या एनजीओंनी आर्थिक लाभाचा योग्य वापर, नियम आणि अटींना अनुसरुन केला नसल्यास अर्थ सहाय्य रद्दही होऊ शकतं, अशी माहिती आहे.

ठाकरे सरकार सत्तेवर आल्यापासून फडणवीस सरकारने घेतलेल्या काही निर्णयांना ब्रेक लावले जात आहे तर काही रद्द करण्यात येत आहेत. मेट्रो कारशेड, बुलेट ट्रेन प्रकल्प या मोठ्या निर्णयांचा त्यात समावेश आहे.

हेही वाचा -"रॉ' चा अधिकारी, शास्त्रज्ञ असल्याचे भासवून 25 जणांना याने घातला अडीच...

दरम्यान, ज्या संस्थांनी राज्य सरकारकडून अर्थ सहाय्य घेतलं आहे, ते सर्व नियम आणि अटींना अनुसरुन आहे का? ज्या प्रमाणात फंड देण्यात आला त्यानुसार त्या संस्थेने काम केलं का? याची चौकशी करणाऱ्याची तयारी ठाकरे सरकारने केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Uddhav thackeray govt to review ngo fund related rss