Ajit Pawar: 'अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत तर...', ठाकरे गटाचा दावा

लवकरच घटनेनुसार एकनाथ शिंदे व त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल, अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल असा दावा
Ajit Pawar
Ajit PawarSakal

राज्याच्या राजकारणात काल मोठा भूकंप झाला. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि समर्थक आमदारांनी बंड करत शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होण्याचा मोठा निर्णय घेतला. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची तर छगन भुजबळ यांच्या ८ आमदारांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली. या घटनेमुळे महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच ढवळून निघालं आहे. अशातच, ठाकरे गटाचे मुखपत्र सामना अग्रलेखातून एक खळबळजनक दावा करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

'महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल'

"शरद पवार यांनी महिनाभरापूर्वीच पक्षात भाकरी फिरवली. अजित पवारांनी लगेच नवी चूल, नवा तवा आणून स्वतःची भाकरी थापली. शिंद्यांची भाकरी करपली. भाजप आता शिंद्यांचे राजकारण अजित पवारांच्या चुलीत घालेल व त्यावर शेकोटी घेत बसेल. महाराष्ट्राला नवा मुख्यमंत्री लवकरच मिळेल. तोही औटघटकेचाच ठरेल. शिवरायांच्या राज्यात हे काय चालले आहे?", अशी टीका सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आली आहे.(Latest Marathi News)

"महाराष्ट्राच्याच नव्हे, तर देशाच्या राजकारणाचाही चिखल मोदी व शहा यांच्या भारतीय जनता पक्षाने केला आहे. अजित पवार त्यांच्या समर्थक आमदारांसह रविवारी दुपारी राजभवनात पोहोचतात. पाठोपाठ देवेंद्र फडणवीस त्यांच्या लवाजम्यासह येतात व पवार हे आठ मंत्र्यांसह शपथ घेऊन स्वतःला भाजपच्या दावणीला बांधून घेतात. अजित पवार यांच्या सरकारीकरणास काय म्हणायचे?" असा सवालही उपस्थित करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

'अजित पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत...'

"जे शिवसेनेच्या बाबतीत वर्षभरापूर्वी घडले तेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत घडले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्याचा विक्रम प्रस्थापित केला आहे; पण या वेळी ‘डील’ पक्के आहे. पवार हे उपमुख्यमंत्री पदासाठी गेले नाहीत. लवकरच घटनेनुसार एकनाथ शिंदे व त्यांच्या फुटीर आमदारांचे विसर्जन होईल व अजित पवारांना सिंहासनावर बसवले जाईल", असा खळबळजनक दावा सामनातून करण्यात आला आहे.

Ajit Pawar
Sharad Pawar: '1980 मध्ये मला सगळे सोडून गेले होते पण...', शरद पवारांचा अजित पवारांना इशारा

'देवेंद्र फडणवीसांचा पोपट झाला'

"या सगळय़ात ‘पोपट’ झाला आहे तो श्रीमान देवेंद्र फडणवीस यांचा. ‘‘नाही, नाही. राष्ट्रवादीबरोबर कदापि जाणार नाही. तो भ्रष्टाचाऱयांचा पक्ष आहे,’’ असे ते मान हलवत, मानेला झटके देत सांगत होते. अजित पवार यांच्यावर 70,000 कोटींच्या सिंचन भ्रष्टाचाराचा आरोप आहे व पवारांना सोडणार नाही अशी त्यांची भाषा होती. यानिमित्ताने भाजपचा खरा चेहरा पुन्हा उघडा पडला", अशी खोचक टीका सामनातून फडणवीसांवर करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

"ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे. एक मिंधे जातील व दुसरे येतील", असा हल्लाबोलही सामनातून शिंदे गटावर करण्यात आला आहे.(Latest Marathi News)

Ajit Pawar
Devendra Fadanvis: उपमुख्यमंत्री पद डावलून देवेंद्र फडणवीसांची दिल्लीत वर्णी?

शिंदे व त्यांच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार

शिंदे व त्यांच्या आमदारांच्या जखमेवर मीठ चोळण्याचाच हा प्रकार. ज्यांनी स्वाभिमानासाठी वगैरे बतावण्या करून शिवसेना फोडली त्यांचे नशीबच आता फुटले. त्यांचे नकली हिंदुत्वही संपले. शिंदे व त्यांच्या आमदारांवर अपात्रतेची तलवार कोसळण्याचा दिवस जवळ आला हाच राजभवनातील रविवारच्या शपथविधीचा खरा अर्थ आहे.(Latest Marathi News)

एक मिंधे जातील व दुसरे येतील. महाराष्ट्राला त्यातून काय मिळाले? महाराष्ट्राचे राजकारण इतक्या खालच्या पातळीवर जाऊन पोहोचले की, सर्व चित्र पाहून मन विषण्ण होते. महाराष्ट्राच्या संस्कृतीला आणि वैभवाला व्यापारी राजकारण्यांची दृष्ट लागली आहे. आम्ही कुणालाही विकत घेऊ शकतो, कोणताही पक्ष फोडू शकतो या अहंकाराने माजलेल्यांच्या हाती लोकशाहीची सूत्रं आहेत.(Latest Marathi News)

Ajit Pawar
NCP Leader: शिंदे-फडणवीस सरकारमधील पहिली महिला मंत्री म्हणून अदिती तटकरेंनी घेतली शपथ

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com