
Uddhav Thackrey : नवीन पक्षासाठी उद्धव ठाकरे अॅक्शन मोडमध्ये; कशी असणार नवी घटना?
शिवसेनेत बंड करून एकनाथ शिंदे आणि समर्थक यांनी भाजपसोबत जात नवीन सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेतील 55 पैकी 40 आमदार आणि 13 खासदार यांनी बंड करत शिंदेंना पाठिंबा दिला. त्यामुळे उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष कुमकवत झाला. त्यात खरी शिवसेना कोणाची असा प्रश्न निर्माण झाला. त्यानंतर हा वाद निवडणूक आयोगाकडे पोहचला. तर सुप्रीम कोर्टातही याबाबतचा वाद सुरू आहे.
निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटांच्या बाजूची कागदपत्रे तपासून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदे यांना देण्यात आलं. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी यासंदर्भात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. त्यानंतर आता उद्धव ठाकरे यांच्याकडून नव्या पक्षाची नवी घटना निर्माण करण्यासाठी लीगल फर्मची नेमणूक करण्यात आली आहे.
तर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे असं नाव सध्या ठाकरे गटाकडून सगळीकडे लावले जात आहे. तर मशाल चिन्हाचा वापर केला जात आहे. परंतु हे नाव आणि चिन्हं ठाकरे गटाला अंधेरी निवडणुक आणि कसबा निवडणुकीपुरतेच वापरण्याची मुभा देण्यात आली होती. त्यानंतर ठाकरे गटाचं निवडणूक चिन्हं आणि नाव काय असणार हे ठरण्याआधीच ठाकरे गटाने हालचाली सुरू केल्या आहेत.
शिवसेना मूळ पक्ष एकनाथ शिंदे यांना मिळाल्यानंतर शिवसेना-उद्धव बाळासाहेब ठाकरे गट पुन्हा अॅक्शन मोडमध्ये दिसून येत आहे. तयार होणाऱ्या नव्या घटनेत जुन्या शिवसेनेतील घटनेचा गाभा असणार आहे. उद्धव ठाकरे यांचे पक्षप्रमुखपद नव्या पक्षातही कायम असणार आहेत. तसेच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे पक्षाचे सर्व आधिकार राहतील अशी माहिती मिळत आहे.
उद्धव ठाकरेंची नवी शिवसेना कशी असेल?
नव्या शिवसेनेमध्येही उद्धव ठाकरेच पक्षप्रमुख असतील. तर नव्या पक्षाचे सर्व आधिकार उद्धव ठाकरें कडेच असणार आहेत. जुन्या शिवसेनेच्या घटनेचाच गाभा या नव्या घेतनेत कायम असणार आहे. पक्षाची नवी घटना तयार करण्यासाठी कायदेतज्ज्ञांची टीम बनवण्यात आली आहे.