Shiv Sena : गोमूत्रधारी चंद्रकांत…; उद्धव ठाकरेंचा झाला घोळ, पाटलांवर टीका करताना घेतलं KKR च्या कोचचं नाव

Uddhav Thackeray mistakenly mention kkr coach Chandrakant pandit over chandrakant patil babri statement
Uddhav Thackeray mistakenly mention kkr coach Chandrakant pandit over chandrakant patil babri statement

भाजपचे नेते चंद्रकांत पाटील यांनी बाबरी पाडण्यात बाळासाहेब ठाकरे व शिवसेनेचा काही संबंध नव्हता असं विधान केलं. यावरून राज्यातील राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. या विधानानंतर आता उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेत चंद्रकांत पाटलांच्या विधानाचा चांगलाच समाचार घेतला.

आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे हे चंद्रकांत पाटलांचं नावच विसरल्याचं पाहायला मिळालं. पत्रकार परिषदेच्या सुरूवातीलाच उद्धव ठाकेर म्हणाले की, विषय फार गंभीर आहे. काल गोमूत्रधारी चंद्रकांत पंडीत... आणि लगेच उद्धव ठाकरेंना चूक लक्षात आली. त्यांनी चुकून सध्या प्रसिद्धीच्या झोतात असलेले आयपीएल टीम केकेआरचे प्रशिक्षक चंद्रकांत पंडीत यांचं नाव घेतलं. यानंतर हसून उद्धव ठाकरे यांनी नाव दुरुस्त करत चंद्रकांत पाटील यांचा उल्लेख केला.

Uddhav Thackeray mistakenly mention kkr coach Chandrakant pandit over chandrakant patil babri statement
Aaditya Thackeray : राजकारणात खळबळ करण्याची क्षमता असणाऱ्या दोन युवराजांची भेट, भावी युतीची नांदी?

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, चंद्रकांत पाटील हे आपल्या बाबरीच्या आठवणींच्या खंदकातून बाहेर पडले आहेत. बाबरीच्या आठवणीच्या खंदकातून असे बरेच उंदीर बाहेर पडत आहेत. पण संतापजनक गोष्ट ही आहे ज्यावेळी बाबरी पाडली तेव्हा हे सगळे उंदीर बिळामध्ये लपले होते. एकही उंदीर बाहेर पडायला तयार नव्हता.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

Uddhav Thackeray mistakenly mention kkr coach Chandrakant pandit over chandrakant patil babri statement
MS Dhoni Video : कार्तिकची चूक पाहून चाहत्यांना आठवला धोनी! 7 वर्ष जुना Video Viral

अगदी आपले पंतप्रधान हे सुध्दा बांगलादेशच्या त्या सत्याग्रहात सहभागी होते पण बाबरीच्या आंदोलनात कदाचीत हिमालयात असतील मला माहिती नाही. तेव्हाचे भारतीय जनता पक्षाचे किंवा भरकटलेल्या जनता पक्षाचे उपाध्यक्ष सुंदरसिंह भंडारी यांनी अंगलट यायला नको म्हणून बाबरी पाडण्यामध्ये भाजपचं कोणी नसून हे काम कोणी केलं असेल तर शिवसैनिकांनीच केलं असेल असं सांगितलं होतं असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

चंद्रकांत पाटील काय म्हणाले होते

बाबरी प्रकरणावर एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत चंद्रकांत पाटील म्हणाले होते की "त्यावेळेचा ढाचा पडल्यानंतर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी म्हटलं की होय, याची जबाबदारी मी घेतो. जबाबदारी घेतो म्हणजे काय? बाळासाहेब तिथे गेले होते, शिवसेना तिथे गेली होती का बजरंग दिलं तिथे होतं? कारसेवक कोण होते? काही एवढं जनरलाइज करण्याचं कारण नाही. कारसेवक हिंदू होते. कारसेवक बजरंग दल आणि दुर्गा वहिनींच्या नेतृत्वाखाली गेले होते. ते असे नव्हते की हम बजरंग दल का नाम नही लेंगे. हम ना शिवसेना के नाही, बजरंग दल के नही असं त्यांचं नव्हतं. सगळ्यांनी नेतृत्व मान्य केलं होतं. की ये कर सकते है आणि त्यांनी केलं ते," असं चंद्रकांत पाटील मुलाखतीवेळी बोलताना म्हणाले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com