
Marathi Bhasha: शिवसेनेचे मुख्य नेते आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील एका कार्यक्रमात 'जय हिंद, जय महाराष्ट्र' सोबत 'जय गुजरात' असे म्हटल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे (उबाठा) गटाकडून त्यांच्यावर जोरदार टीका सुरू असतानाच, आता शिवसेनेने (शिंदे गट) उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. शिंदे गटाने आपल्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून उद्धव ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ पोस्ट केला आहे, ज्यात ते स्वतः 'जय गुजरात' म्हणताना दिसत आहेत. या व्हिडिओसोबत 'एकतर हे भोंदू आहेत नाही तर संधीसाधू' अशी उपरोधिक टीकाही करण्यात आली आहे.