Thane News: उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; CM शिंदेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Thane News: उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; CM शिंदेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

Thane News: उद्धव ठाकरे अ‍ॅक्शन मोडवर; CM शिंदेंच्या गडाला सुरुंग लावण्यासाठी पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या

शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर पुन्हा एकदा शिवसेनेला सावरण्यासाठी आणि भरारी घेण्यासाठी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न सुरू केले आहेत. याचाच एक भाग म्हणून आता उद्धव ठाकरे यांनी ‘मिशन ठाणे’ सुरू केलं आहे. या ‘मिशन ठाणे’ अंतर्गत ठाण्यातील शिवसेना कार्यकारिणीवर उद्धव ठाकरे यांनी नियुक्त्या केल्या आहेत.

ठाण्यातील संघटकांपासून ते उपविभाग प्रमुखपदी अनेकांच्या नियुक्त्या जाहीर झाल्या आहेत. उद्धव ठाकरे यांनी नियुक्त्यांमधून जुन्यांसह नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे जिल्ह्याला काबिज करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या केल्या असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

हे ही वाचा : पुण्याचा पहिला 'माॅल'- तुळशीबाग

शिवसेनेच्या ठाकरे गटाचे मुखपत्र असणाऱ्या दैनिक सामनातून ठाण्यातील पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. सामनामधून पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्यांची पानभर यादी जाहीर करण्यात आली आहे. ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या नियुक्त्यांना अधिक महत्त्व आहे.

हेही वाचा: Pune News : ‘पुणे रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवू’ अशी धमकी देणाऱ्याच्या मुसक्या आवळल्या!

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केल्यानंतर आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर या पहिल्यांदाच नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. ठाण्यातील विधानसभा क्षेत्रनिहाय या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. सहसमन्वयक, उपविभागप्रमुख, उपशाखाप्रमुख, उपशहरप्रमुख, शाखाप्रमुख, विधानसभा क्षेत्रप्रमुख, विभागप्रमुख, विधानसभा क्षेत्र सचिव आदी पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.