
Disha Salian: दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. दिशाच्या मृत्यूप्रकरणी पुन्हा सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केलीय. एवढंच नाही तर दिशाच्या वकिलांनी आदित्य ठाकरेंचं नाव घेऊन त्यांच्यासह इतरांची कस्टडी घेण्याची मागणी केलीय.