Shivsena Symbol : अपात्रतेच्या मुद्द्यावर उद्धव ठाकरेंचं निवडणूक आयोगाला आवाहन; म्हणाले १६ जण…

Uddhav Thackeray on Shivsena symbol row  slam shinde faction Maharashtra politics
Uddhav Thackeray on Shivsena symbol row slam shinde faction Maharashtra politics esakal

राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या दोन गटात शिवसेना कोणाची यावरून वाद सुरू आहे. निर्णय कोणाच्या बाजून लागेल याकडे सर्व महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.यातच सुप्रीम कोर्टात १४ फेब्रुवारीपासून शिवसेना कोणाची या वादावर सुनावणी होणार आहे.

यादरम्यान बंडखोरी केलेल्या शिवसेना सदस्यांच्या आपात्रता यातिकेवर निर्णय हा आधी झाला पाहिजे. त्याआधी निवडणूक आयोगाचा निकाल लागू नये असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. आज उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या पत्ररकार परिषदेत ते बोलत होते.

उद्धव ठाकरे यावेळी बोलताना म्हणाले की, शिवसेनेचं काय होणार अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू आहे. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी १४ तारखेपासून सलग सुरू होणार आहे. मी दुसरी शिवसेना मानत नाही. शिवसेना एकच आहे आणि राहणार आहे. निवडणूक आयोगापुढे सर्व मुद्दे मांडले आहेत, लेखी दिले आहेत.

Uddhav Thackeray on Shivsena symbol row  slam shinde faction Maharashtra politics
Kasba By-Election : अर्ज मागे घे अन्…; अभिजीत बिचकुलेंना जीवे मारण्याची धमकी

सर्वांच्या मनात काय होणार याबद्दल संभ्रम आहे. पण कोणताही पक्ष स्थापन होतो तो जनतेच्या पाठींब्याने होतो. जर का पक्ष केवळ निवडूण आलेल्या लोकप्रतिनीधींवर अवलंबून राहणार असेल, तर उद्या कोणीही जगातील एक आणि दोन नंबरचे उद्योगपती आमदार खासदार फोडून पंतप्रधान बनतील. त्या पक्षाला अर्थ नाही. त्याला गद्दारी म्हणतात असे उद्धव ठाकरे म्हणले.

शिवसेनेने बनवलेल्या घटनेनुसार पक्षातील निवडणूका होतात. त्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागीतली ती मिळालेली नाही. ती मिळाली की निवडणूक घेऊ असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले

Uddhav Thackeray on Shivsena symbol row  slam shinde faction Maharashtra politics
Rohit Pawar : अमेरिकेतील छत्रपतींचा पुतळा चोरीला; रोहित पवारांनी शिंदे सरकारकडे केली 'ही' मागणी

शिवसेना प्रमुख हा शब्द आम्ही गोठवला आणि शिवसेना पक्षप्रमुख पद निर्माण केलं गेलं आणि त्या पदावरून कारभार मी बघतो आहे. त्यांनी विभागप्रमुख, मुख्य नेता ही त्यांनी निर्माण केलेलं पदे घटनाबाह्य आहेत. गद्दार गटाचा निवडणूक आलेले नेते म्हणजेच पक्ष हा दावा हास्यास्पद आहे असेही उद्धव ठाकरे म्हणाले. गद्दारांनी शिवसेनेवर दावा करावा हा नीचपणा आहे असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray on Shivsena symbol row  slam shinde faction Maharashtra politics
Rahul Gandhi: राहुल गांधींच्या मुंबई एअरपोर्टबाबतच्या आरोपांवर GVK कंपनीचा खुलासा; म्हणे, अदानी ग्रुपने…

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, १६ जण अपात्र ठरण्याची शक्यता दाट आहे. सगळ्या घटनातज्ञ आणि घटनेत नमूद केल्याप्रमाणे त्याचा निकाल आधी लागावा अशी आमची अपेक्षा आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयोगाने काय करावं हे सांगण्याचा आमचा हेतू नाहीये असेही उद्धव ठाकरे म्हणाले. सदस्य आपात्रतेचा निर्णय आधी झाला पाहिजे. त्याआधी निवडणूक आयोगाचा निकाल लागू नये असे मत उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com