Uddhav Thackeray : ‘रश्मी ठाकरेंच्या एंट्रीमुळेच शिवसेना अडचणीत’

उद्धव ठाकरे हे जोपर्यंत मातोश्रीवर बसून होते तोवर ते शिवसैनिकांना मान्य होतं.
Uddhav Thackeray : ‘रश्मी ठाकरेंच्या एंट्रीमुळेच शिवसेना अडचणीत’

मुंबई : रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांनी राजकारणात प्रवेश केल्यानेच शिवसेनेची सगळी अडचण सुरु झालीये. त्यांचाही जनसंपर्क नसल्याचं परखड मत राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर यांनी व्यक्त केलंय. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे जोपर्यंत मातोश्रीवर बसून होते तोवर ते शिवसैनिकांना मान्य होतं. पण जेव्हा ते स्वत: खुर्चीवर बसले आणि इतकंच नव्हे तर आदित्य ठाकरेंना तिकीट देत थेट मंत्रिपद दिले. हे सर्वसामान्य शिवसैनिक कसं सहन करतील, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केलाय. (Uddhav Thackeray News)

Uddhav Thackeray : ‘रश्मी ठाकरेंच्या एंट्रीमुळेच शिवसेना अडचणीत’
महाराष्ट्रहितासाठी आता निर्णय घेणे गरजेचे : एकनाथ शिंदेंचं ट्वीट

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेच्या राजकीय भवितव्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होतायंत. या पार्श्वभूमीवर साम टीव्हीवर ठाकरे घराण्याचा राजकीय अस्त? या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते. या चर्चासत्रात श्रीकांत उमरीकर, मकरंद मुळे आणि ज्येष्ठ पत्रकार मृणालिनी नानिवडेकर हे सहभागी झाले होते. रश्मी ठाकरे यांच्याबाबत मकरंद मुळे म्हणाले, रश्मी ठाकरेंना माँसाहेबांचे स्थान घेता आलेलं नाही. छगन भुजबळ, नारायण राणे हे शिवसेनेपासून तुटले तरी त्यांच्या मनात माँसाहेब हे श्रद्धेच स्थान होतं. हे स्थान मिळवण्यासाठी परिश्रम करावे लागतात, नुसतं आडनाव असून चालत नाही.

Uddhav Thackeray : ‘रश्मी ठाकरेंच्या एंट्रीमुळेच शिवसेना अडचणीत’
उद्धव ठाकरेंना ऐकल्यानंतर त्यांच्याविषयी आदर वाढला, जलील यांनी केले कौतुक

शिवसेना कोणाची... उद्धव ठाकरे की एकनाथ शिंदेंची?

मी बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे त्या भूमिकेला पाठिंबा देतोय, हे एकनाथ शिंदेंचं विधान महत्त्वाच असल्याचं राजकीय विश्लेषक श्रीकांत उमरीकर यांना वाटते. हिंदुत्वाच्या आधारावर शिवसेना उभी होती, हाच आधार महाविकास आघाडीच्या सत्ता तडजोडीत काढला गेला. आपल्या मतदारांसमोर कोणत्या तोंडाने जायचे हा शिवसेनेसमोरचा मोठा प्रश्न आहे. इथे काँग्रेस- राष्ट्रवादीचा मतदार मुद्दा नाही.

युती म्हणून भाजपा- शिवसेनेचा जो मतदार आहे त्यांना सामोरे कसं जाणार हा शिवसेना नेत्यांसमोरील प्रश्न आहे, असं उमरीकर यांनी सांगितले. हिंदुत्व आणि कामे होत नाही, ही एकनाथ शिंदेंच्या बंडामागील दोन प्रमुख कारणं असावीत, असं त्यांना वाटते. आदित्य ठाकरेच स्वीकारायचे असतील तर आपण स्वतंत्र काहीतरी करुया, गेल्या अडीच वर्षांमध्ये शिवसेना नेत्यांमध्ये ही भावना वाढली, असं मुळे यांनी म्हटलंय.

Uddhav Thackeray : ‘रश्मी ठाकरेंच्या एंट्रीमुळेच शिवसेना अडचणीत’
'वेषांतर करुन तर पहा म्हणजे....' मनसेच्या संदीप देशपांडेंचा मुख्यमंत्र्यांना टोमणा

काँग्रेससारखीच शिवसेनेची अवस्था होणार?

बाळासाहेब ठाकरे असतानाही शिवसेनेत खदखद होती. नारायण राणे, छगन भुजबळ, राज ठाकरे यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिल्याचं सर्वांनाच माहितीये. या खदखदीमागचं कारण म्हणजे या पक्षांमध्ये घराणेशाही आहे. आपण कायम नंबर २, ३ किंवा ४ राहणार ही भावना नेत्यांमध्ये रुजली. सद्यस्थिती उद्धव ठाकरेनंतर आदित्य ठाकरे हे स्ष्ट चित्र आहे. अशा परिस्थितीत कर्तृत्ववान शिवसेना नेत्यांना दुसरा पर्याय नाही, असं मकरंद मुळे यांनी सांगितले. २०१४ नंतर ज्या पद्धतीने काँग्रेसची घसरण झालीये, तशीच स्थिती या बंडानंतर महाराष्ट्रात शिवसेनेचीही होऊ शकते, अशी शक्यताही त्यांनी वर्तवली.

लोकनेत्यांना टाळल्यावर हीच अवस्था होणार

उद्धव ठाकरेंना अडीच वर्षांत संघटनेसाठी प्रभावशाली काम करता आलेलं नाही. शिवसैनिक, बाळासाहेबांचा वारसा याचा अभिमान असावा. अभिमान अहंकाराकडे झुकणे, दरबारी राजकारण करणाऱ्या ठराविक सल्लागारांचं ऐकणे आणि लोकनेत्यांना डावलल्यास घराणेशाही असलेल्या पक्षाची हीच अवस्था होईल, असं मत मुळे यांनी व्यक्त केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com