esakal | मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास उद्धव ठाकरे तयार - राऊत
sakal

बोलून बातमी शोधा

sanjay raut

उद्धव ठाकरेंनी यास सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचा दावा ‘सकाळ’शी बोलताना राऊत यांनी केला.

मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास उद्धव ठाकरे तयार - राऊत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई - शिवसेनेचाच मुख्यमंत्री होणार, ही भविष्यवाणी सत्यात उतरवण्यासाठी चंग बांधलेले खासदार संजय राऊत यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रिपद स्वीकारण्यास तयार झाल्याचा दावा केला. आघाडीतील दोन्ही पक्षांनी उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपद स्वीकारावे, असा प्रस्ताव मांडला. उद्धव ठाकरेंनी यास सकारात्मक प्रतिसाद देत मुख्यमंत्रिपद स्वीकारण्याची तयारी दर्शविल्याचा दावा ‘सकाळ’शी बोलताना राऊत यांनी केला.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

मुख्यमंत्रिपदी कोण, याबाबतची उत्सुकता दूर झाली असून, येत्या काही काळातच या नावाची घोषणा केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुख्यमंत्रिपदावर शिक्कामोर्तब झाल्यानंतर यापुढे ५८ मंत्रिपदांच्या वाटपाविषयीची चर्चा सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

दिवसभरातील घडामोडी
    दु. १२ - शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर शिवसेनेच्या आमदारांसोबत बैठक.
    सायं. ५ - शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची नेहरू सेंटर येथे मॅरेथॉन बैठक.
    सायं. ७.३० - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार बैठकीतून बाहेर. उद्धव ठाकरे यांच्या नावावर सहमती असल्याचे जाहीर केले.