भाजपच्या वाचाळ नेत्यांमुळं देशाची अब्रू गेली, याची भरपाई कोण करणार - उद्धव ठाकरे

CM Uddhav Thackeray Shiv Sena Aurangabad rally Live updates
CM Uddhav Thackeray Shiv Sena Aurangabad rally Live updates
Updated on

औरंगाबाद : भाजपच्या कोणत्यातरी टिनपाट नेत्याने प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यामुळे चांगलाच वाद निर्माण झाला. यामुळे मुस्लिम देशांनी भारताचा विरोध केला. भारताला माफी मागायला सांगितली. भाजपच्या वाचाळ नेत्यांमुळे देशाची अब्रू गेली. याची भरपाई कोण करणार, असा प्रश्न मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी केंद्र सरकारला विचारला. (Uddhav Thackeray said that the country's reputation was tarnished due to BJP leaders)

भाजपच्या (BJP) माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा (Nupur Sharma) यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने उठलेले वादंग अद्याप शांत झालेले नाही. प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य भाजपच्या प्रवक्त्याने केले. मग देशाने माफी का मागायची. भाजपचा प्रवक्ता म्हणजे देशाचा प्रवक्ता होत नाही, असेही उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) म्हणाले.

CM Uddhav Thackeray Shiv Sena Aurangabad rally Live updates
...तो आक्रोश मोर्चा सत्तेसाठी होता; मुख्यमंत्र्यांचा नाव न घेता फडणवीसांना टोला

आपल्या देवी-देवतांचा अपमान कोणी करायचा नाही. तसेच तुम्हीही त्यांचा अपमान करण्याची गरज नाही. मात्र, त्या टिनपाट नेत्याने केलेल्या वक्तव्याने देशाला मागी मागायला लावली. यात देशाची काय चूक आहे. वक्तव्य भाजपच्या (BJP) नेत्याने केले. मग देशाने माफी का मागायची, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

टिनपाट नेत्यामुळे देशाच्या पंतप्रधानांचा अपमान झाला. त्यांचा फोटो कचराकुंडीवर लावला गेला. हो ते आपले विरोधक आहे हे मान्य आहे. मात्र, ते आपल्या देशाचे पंतप्रधान आहे. त्यांचा अपमान देशाचा अपमान आहे. मला हा अपमान सहन होत नाही. तुम्हाला तरी होतो का, असा प्रश्न उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी उपस्थित शिवसैनिकांना विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com