esakal | शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण
sakal

बोलून बातमी शोधा

Uddhav Thackeray send invitation to Narendra Modi for oath taking ceremony

शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून उद्या (ता.२७) होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरूनच उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा आणि अभिनंदनही केलं. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला देखील शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शिवसेनेकडून अधिकृत पाठवण्यात आली आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी नरेंद्र मोदींना उद्धव ठाकरेंचं निमंत्रण

sakal_logo
By
टीम-ई-सकाळ

मुंबई : शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना फोन करून उद्या (ता.२७) होणाऱ्या शपथविधी सोहळ्याचं निमंत्रण दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी फोनवरूनच उद्धव ठाकरे यांना दिल्या शुभेच्छा आणि अभिनंदनही केलं. दिल्लीतील पंतप्रधान कार्यालयाला देखील शपथविधी सोहळ्याची निमंत्रण पत्रिका शिवसेनेकडून अधिकृत पाठवण्यात आली आहे.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

राज्यात विधानसभा निकालानंतर तब्बल महिनाभर चाललेल्या राजकीय घडामोडींनंतर मंगळवारी महाविकास आघाडीचे सरकार येणार असल्याचे निश्‍चित झाले. यानुसार महाविकास आघाडीचे नेते, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उद्या मुख्यमंत्री म्हणून (ता. 28) शिवाजी पार्कवर सायंकाळी 6.40 वाजता मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. 

वार झाला मुंबईत जखम झाली दिल्लीला

या सोहळ्याची जय्यत तयारी केली असून, अनेक दिग्गज व्यक्ती या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर राज्यभरातून एक लाख शिवसैनिक, विविध राज्यांचे मुख्यमंत्री, राजकीय नेते, चित्रपटसृष्टीतील कलाकारांना निमंत्रण देण्यात आले आहे. राज्यातील शेतकरी, आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांनादेखील सोहळ्यासाठी बोलावण्यात आले आहे.

loading image
go to top