Uddhav Thackeray : 'मुद्दाम जाऊन मुफ्ती यांच्या बाजूला बसलो...'; उद्धव ठाकरेंनी सांगितलं पाटणामध्ये नेमकं काय घडलं

Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySakal

बिहारची राजधानी पाटणा येथे झालेल्या विरोधीपक्षांच्या बैठकीला उद्धव ठाकरे यांनी देखील हजेरी लावली होती. मात्र या बैठकीला मेहबुबा मुफ्ती देखील होत्या. यावरून उद्धव ठाकरे यांच्यावर भाजपकडून टीका करण्यात आली होती. दरम्यान आज मुंबईत बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपला सडेतोड प्रत्त्यूत्तर दिलं आहे.

माझ्यावरती जर मेहबुबा मुफ्ती बाजूला बसल्या म्हणून टीका करणार असाल तर मला देवेंद्र फडणवीसांना सांगायचं आहे की असे फोटो माझ्याकडे देखील आहेत. असे म्हणत उद्धव ठाकरेंनी अमित शाह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेहबुबा मुफ्ती तसेच पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांच्यासोबतच्या भेटींचे फोटो यावेळी दाखवले. हे मिठ्या मारतायत टोप्या घालताय यांच्या मुस्लिम प्रेमाचे अल्बमच माझ्याकडे आहेत असा टोलाही उद्धव ठाकरे यांनी यावेळी लगावला.

Uddhav Thackeray
Maharashtra Politics : "केंद्र शासनाच्या माध्यमातून येणारी प्रत्येक गुंतवणूक दरवेळी गुजरातमध्येच का? महाराष्ट्रात…"

तुमच्या नेत्यांनी केलं ते आम्ही केलं तर आम्ही गुन्हेगार ठरतो. मी जर गुन्हा केला असेल तर तुमचे नेते गुन्हेगार आहेत हे बोला. अगदी मोदी आणि अमित शाह यांनी देखील गुन्हा केला आहे. मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मी मेहबुबा मुफ्तींच्या बाजूला बसलो म्हणून माझ्यावर टीका करता तर मी परत एकदा सांगतो मी पाटणाला गेलो तेव्हा मुद्दाम जाऊन मुफ्ती यांच्या बाजूला बसलो, कारण त्या आता भाजपच्या लॉंड्रीत स्वच्छ झाल्या आहेत. काल मी मुफ्ती यांना विचारलं की ते आले, पण तुम्ही कसे गेलात तेव्हा त्यांनी मला सांगितलं की सत्ता स्थापन करताना मला त्यांनी सांगितल की 370 आपण हटवणार नाही असं सांगितलं होत म्हणून पाठिंबा दिला, असेही उद्धव ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : ठाकरेंच्या स्वागताला विमातळावर आले बिहारचे मुख्यमंत्री; राऊत म्हणाले, नाम ही काफी है...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com