Tilak award for PM Modi : मोदी-पवार येणार एकाच मंचावर; ठाकरे म्हणाले, सत्तर हजार कोटींचं काय झालं?

 Uddhav Thackeray Slam BJP Over Sharad Pawar PM Modi Sharing stage for lokmanya tilak award ceremony in pune
Uddhav Thackeray Slam BJP Over Sharad Pawar PM Modi Sharing stage for lokmanya tilak award ceremony in pune

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर करण्यात आला असून हा पुरस्कार पुण्यात देण्यात येणार आहे. दरम्यान या कार्यक्रमाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आण राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे एका मंचावर येणार आहेत. दरम्यान यावरून उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला आहे.

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नॅशनल करप्ट पार्टी म्हणत जोरदार टीका केली होती. तसेच राष्ट्रवादीतील नेत्यांवर ७० हजार कोटींचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप देखील केला. मात्र टिळक स्मारक संस्थेकडून दिला जाणारा यंदाचा ४१ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार शरद पवारांच्या उपस्थितीत पंतप्रधान नरेंद्र मोदींना देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर शरद पवार आणि पंतप्रधान मोदी एका मंचावर येणार आहेत, यावरून उद्धव ठाकरेंनी निशाणा साधला आहे.

 Uddhav Thackeray Slam BJP Over Sharad Pawar PM Modi Sharing stage for lokmanya tilak award ceremony in pune
Maharashtra Politics : त्या 12 आमदारांच्या नियुक्तीत 'मोदी' घालणार बिब्बा? जाणून घ्या आत्तापर्यंत काय-काय झालं

उद्धव ठाकरे म्हणाले की, मी वर्तमानपत्रात वाचलं येत्या चार-पाच दिवसात लोकमान्य टिळक पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देण्यात येणार आहे. तो कोणाच्या हस्ते देण्यात येणार आहे? शरद पवार. मग सत्तर हजार कोटी रुपयांच्या घोटाळ्याचं काय झालं. मला तारतम्य कळत नाहीये. सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का? हा लोकमान्यांचा प्रश्न कोणाला विचारायचा. कोण कोणाला विचारणार आणि याचं उत्तर कोण देणार.

७० हजार कोंटींच्या घोटाळ्याचा आरोप केला तो पक्ष आता तुमच्या बरोबर आला. शरद पवार तुमच्यासोबत व्यासपीठावर असणार. आमच्यातले मिंधे तुमच्यासोबत आहेत. मग शेवटी लोकांनी बघायचं काय? जे आरोप केले असतील त्याला जागा. आरोप करताना जबाबदारीनं वागा, असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी सुनावलं.

 Uddhav Thackeray Slam BJP Over Sharad Pawar PM Modi Sharing stage for lokmanya tilak award ceremony in pune
Cabinet Expansion : फॉर्म्युला फायनल! अजित पवार गटाला मंत्रिमंडळ विस्तारात मिळणार 4 मंत्री पदे… शिंदे गटाचे काय होणार?

कधी दिला जाणार पुरस्कार?

लोकमान्य टिळक यांच्या पुण्यातिथीदिनी अर्थात १ ऑगस्ट रोजी दरवर्षी हा पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित केला जातो. यंदा देखील १ ऑगस्ट रोजी पंतप्रधान मोदींना हा पुरस्कार पुण्यात देण्यात येणार आहे. या सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची उपस्थिती असणार आहे. शरद पवारांनाही या कार्यक्रमाचं निमंत्रण देण्यात आलं आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com