Uddhav Thackeray News : तुमचं अर्ध आयुष्य दिल्लीत मुजरे…; उद्धव ठाकरेंचं शिंदे-फडणवीसांना चोख प्रत्युत्तर

Uddhav Thackeray Slam CM eknath shinde devendra fadanvis govt over covid times in khed sabha ratnagiri
Uddhav Thackeray Slam CM eknath shinde devendra fadanvis govt over covid times in khed sabha ratnagiri esakal

खेड : शिवसेना पक्षनाव आणि धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाला दिल्यानंतर रत्नागिरीच्या खेड येथील गोळीबार मैदानात आज उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी शिंदे फडणवीस सरकारवर कडाडून हल्लाबोल केला.

अडीच वर्ष घराबाहेर पडले नाहीत म्हणाणाऱ्या विरोधकांना धारेवर धरले. उद्धव ठाकरे म्हणाले की हे म्हणतात की अडीच वर्ष घराबाहेरच पडले नाहीत.. नाव्हतोच पडलो घराबाहेर, कारण कोरोना होता. पण मी घरामध्ये बसून जो महाराष्ट्र सांभाळला तो गरागरा गुवाहाटीला जावून देखल सांभाळू शकत नाहीयेत, असे ठाकरे म्हणाले.

पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की तुमचा अर्धावेळ फिरण्यामध्येच जातोय. एकतर दिल्लीला मुजरे मारायला जाणं यात अर्ध आयुष्य चाललंय आणि बाकीच्यां काही जणांना खोके अजून मिळले नाहीत, मंत्रिपद देता येत नाही. त्यांना सांभाळण्यात तुमचं उरलेलं आयुष्य जातंय. असा टोला शिंदे-फडणवीस यांच्यावर हल्ला केला.

Uddhav Thackeray Slam CM eknath shinde devendra fadanvis govt over covid times in khed sabha ratnagiri
Sharad Pawar : औरंगजेब फोटो प्रकरणी चौघांवर गुन्हा; शरद पवार म्हणाले, तो फोटो औरंगजेबाचा कशावरून?

पण मी जो महाराष्ट्र सांभाळला तसा कोणाच्याही हातून सावरला गेलाच नसता. देशाच्या पंतप्रधानांचे कोतूक झाले नाही ते महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं म्हणजेच महाराष्ट्राच्या जनतेचे झाले. आपल्या काळामध्ये कधीही मृतदेहांची विटंबना झाली नव्हती जी योगींच्या काळात झाली त्याबद्दल तुम्ही का बोलत नाहीत असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला.

Uddhav Thackeray Slam CM eknath shinde devendra fadanvis govt over covid times in khed sabha ratnagiri
Uddhav Thackeray : ...तर जीभ हासडून टाकू; उद्धव ठाकरेंचा थेट CM शिंदेंना इशारा

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com