
लहान, मोठा भाऊ असं काही नसतं; भावा-भावाचं नातं महत्वाचं असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
मुंबई : लहान, मोठा भाऊ असं काही नसतं; भावा-भावाचं नातं महत्वाचं असल्याचे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आज भाजप शिवसेनेच्या संयुक्त पत्रकार परिषदेत म्हटले आहे.
उद्धव ठाकरे म्हणाले की, आकड्यावर सगळं काही अवलंबून नसतं, एकदा ठरवलं की बाकीच्या वस्तू आपणहून येत असतात. शिवसेना भाजप मनाने एकत्र आहेत. युतीचा प्रश्न समजूतदारपणे सोडवला असल्याचेही उद्धव यांनी स्पष्ट केले आहे. एखादी गोष्ट करायची म्हणजे करायची, तुझं माझं न करता आम्ही सत्तेत आल्यास एकत्रित व्यवस्थित काम करू असेही उद्धव ठाकरे यांनी यावेळी स्पष्ट केले.
Shiv Sena Chief Uddhav Thackeray on 'Aditya Thackeray for CM demands': The first step in politics doesn’t mean that you have to become the Chief Minister of this state. He has just entered politics, this is just the beginning. pic.twitter.com/8xNqfEdDt4
— ANI (@ANI) October 4, 2019
पत्रकारांनी आदित्य ठाकरेच्या मुख्यमंत्रीपदाविषयी प्रश्न विचारले असता, जर शिवसैनिकांची इच्छा असेल तर त्यात गैर काय असे प्रतिसवाल उद्धव यांनी केला. आम्हाला महाराष्ट्र सुजलाम सुफलाम करायचा असल्याचे उद्धव यांनी स्पष्ट केले. यावेळी पत्रकार परिषदेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हेही उपस्थित होते.