
मुंबई : कोल्हापूरमधील पोटनिवडणुकीसाठी आपल्याला डावलल्यानं नाराज असलेल्या राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची मुंबईत भेट घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी क्षीरसागर यांची यशस्वी मनधरणी केली. त्यामुळं आता या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकदीनं शिवसैनिक मैदानात उतरुन महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील, असं क्षीरसागर माध्यमांशी बोलताना म्हणाले. (Successful mindset of Kshirsagar by Uddhav Thackeray Now he ready to campaign for Congress candidate)
क्षीरसागर म्हणाले, "पुढच्या पाच वर्षातही हीच आघाडी सत्तेत येईल आणि खऱ्या अर्थानं एकही शिवसैनिक भाजपला मतदान करणार नाही. भाजप शिवसेनेच्या डोक्यावर पाय देण्याचं काम करतंय. ज्या हिंदुत्ववादी पक्षानं तुम्हाला राज्यात मोठं केलं त्याच्या डोक्यावर तुम्ही पाय ठेवता आहात. शिवसैनिक हे कदापी विसरु शकणार नाहीत. या निवडणुकीत शिवसैनिक मोठ्या ताकदीनं, मोठ्या जिद्दीनं काँग्रेस आणि राष्ट्रवादीपेक्षा जास्त ताकदीनं उतरुन या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवाराला विजयी करतील"
बेगडी भाजपला रोखणं हेच प्राधान्य
सन २०१४ च्या निवडणुकीत मोदींच्या लाटेमध्ये भाजपनं सत्तेत येऊन शिवसेनेच्या डोक्यावर पाय ठेवण्याचा प्रयत्न केला. शिवसेना संपवण्याचा प्रयत्न केला. हे शिवसैनिकांना कदापी मान्य नाही. त्यामुळं हेच शिवसैनिक या निवडणुकीमध्ये पेटून उठणार आहेत. थोडीफार नाराजी असेल तर ती येत्या दोन-तीन दिवसात पूर्ण केली जाईल. १६ तारखेनंतर महाविकास आघाडीचा आमदार मुंबईत येऊन मुख्यमंत्र्यांना भेट घेईल. आज आमच्या डोळ्यासमोरचा प्रश्न आहे तो बेगडी भाजपला रोखायचं. महाराष्ट्रातील जनतेनं पाहिलं आहे की कशा पद्धतीनं शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना भाजप केंद्रीय संस्थांच्या मदतीनं त्रास दिला जातोय. जनतेनं उघड्या डोळ्यानं हे पाहिलं आहे, असंही राजेश क्षीरसागर मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर म्हणाले.
उमेदवारी नाकारल्यानं क्षीरसागर होते नाराज
दरम्यान, कोल्हापूर उत्तर या मतदारसंघातील पोटनिवडणुकीसाठी शिवसेना आणि काँग्रेस या महाविकास आघाडीतील दोन पक्षांतच चुरस निर्माण झाली होती. मुंबईत १७ तारखेला झालेल्या बैठकीत दोन्हीही पक्षाचे नेते आपआपल्या भूमिकेवर ठाम होते. मात्र, नंतर ही जागा काँग्रेसला सोडण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला होता. ही उमेदवारी आपल्यालाच मिळेल अशी क्षीरसागर यांना आशा होती. पण उमेदवारी न मिळाल्यामुळं ते नाराज असल्याची चर्चा होती.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.