esakal | उद्धव ठाकरेंनी घेतली शपथ
sakal

बोलून बातमी शोधा

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सोमवारी आमदारकीची शपथ घेतली.

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली.

उद्धव ठाकरेंनी घेतली शपथ

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासह विधान परिषदेवर निवडून आलेल्या नऊ जणांनी आज विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी सदस्यांना शपथ दिली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

आज सदस्यत्वाची शपथ घेणाऱ्यांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, शशिकांत शिंदे, रणजितसिंह मोहिते-पाटील, रमेश कराड, प्रवीण दटके, गोपीचंद पडळकर, अमोल मिटकरी, राजेश राठोड यांचा समावेश होता. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विधान सभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी रश्‍मी ठाकरे आदींसह सदस्यांचे कुटुंबीय शपथविधी सोहळ्याला उपस्थित होते.