मुंबई - संपूर्ण महाराष्ट्रात महायुतीच्या मंत्र्यांच्या ‘भ्रष्टाचार पे चर्चा करा’, असे आवाहन शिवसेना उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना केले. तसेच हुकूमशाहीच्या विरुद्ध संपूर्ण हिंदुस्थान उभा राहिल्याशिवाय राहणार नाही असेही ठाकरे म्हणाले..आज दादरच्या शिवाजी पार्क मैदानात महायुतीच्या भ्रष्टाचारी मंत्र्यांविरोधात ठाकरेंच्या पक्षाने आंदोलन केले. यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आज संपूर्ण महाराष्ट्र जागा झालेला आहे. महाराष्ट्राच्या प्रत्येक शहरात, प्रत्येक जिल्ह्यात या भ्रष्टाचाऱ्यांच्या विरोधात आपला पक्ष रस्त्यावर उतरला आहे.सत्ताधाऱ्यांशी संघर्ष करायला मर्द लागतो आणि तो मर्द आपल्या पक्षात आहे. हे बिनडोक्याचे आहेत आणि त्यांना सूरत आणि गुवाहाटीला पळून जाण्यासाठी फक्त पाय आहेत. त्यांना डोक्याच्या ऐवजी फक्त खोके आहेत. म्हणून ते खोके घेऊन बसले आहेत अशी चपराक ठाकरेंनी लगावली..ते म्हणाले,की आपले सरकार जेव्हा होते तेव्हा कोणत्याही मंत्र्यावर आरोप झाले की त्याची जबाबदारी घेऊन त्या मंत्र्यांचा राजीनामा घेऊन त्यांना चौकशीला सामोरे जावे लागत होते. मीसुद्धा मुख्यमंत्री असताना राजीनामे घेतले होते. एका मंत्र्यावर महिलेचे आरोप होते, तो वनमंत्री असताना त्याला वनवासात पाठवले होते. अगदी केंद्रातही अशा घटना होत्या..मनोहर जोशी मुख्यमंत्री असताना पाच मंत्र्यांचे राजीनामे घेतले. शिवसेनाप्रमुख म्हणाले होते की जनतेचा रोष आहे, राजीनामा द्या आणि चौकशीला सामोरे जा, जर चौकशीतून निर्दोष सुटलात तर मंत्रिमंडळात घेईन. हा होता कारभार. ते जनताभिमुख सरकार होते. आता पैसे गिळणारे आहे, असा जोरदार हल्ला ठाकरेंनी चढवला..माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड कुठे आहेत? दिल्लीत गेल्यावर मला कळाले की धनकड हे सरकारविरोधात कारस्थान करतील असा संशय आला म्हणून त्यांना तडकाफडकी काढले आणि गायब केले? त्यांनी प्रकृतीकारणास्तव राजीनामा दिला होता. मग ते सध्या कोणत्या रुग्णालयामध्ये आहेत, असा सवाल ठाकरे यांनी उपस्थित केला..कलंकित मंत्र्यांची हकालपट्टी केली जाईल अशी आमची अपेक्षा होती. पण मुख्यमंत्री समज देतात की रमी नका खेळू तीन पत्ती खेळ. समज देऊन सोडले की पुढीलवेळी बॅग बंद करून ठेव म्हणून. पुढीलवेळी सावली बार नव्हे भर ‘उन्हाचा’ बार काढ. पुरावे देऊनसुद्धा या भ्रष्टाचाऱ्यांना केवळ समज देऊन सोडून देणार असाल तर मग माजी उपराष्ट्रपती जगदीप धनकड यांना तत्काळ राजीनामा घेऊन वनवासात का पाठवले?- उद्धव ठाकरे.सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.