मुंबई - ‘उद्धवजी आता २०२९ पर्यंत काही करायचे नाही. आम्हाला तिकडे यायचा ‘स्कोप’ उरला नाही. मात्र तुम्हाला इकडे यायचा ‘स्कोप’ आहे. त्यावर वेगळ्या पद्धतीने विचार करता येईल. आपण वेगळ्या पद्धतीने बोलू,’ अशी मिस्कील टिप्पणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बुधवारी केली.