उदयनराजेंकडून मोदींच्या डोक्यावर शिवकालीन पगडी

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 सप्टेंबर 2019

मोदींना परिधान केलेली पगडी ही लाल रंगाचीच असून, ती मोत्यांनी सजवली होती. मोदी सभास्थळी दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले उदयनराजे भोसले आज (गुरुवार) पंतप्रधान  नरेंद्र मोदींच्या सभेला उपस्थित राहिले. यावेळी उदयनराजेंनी मोदींच्या डोक्यावर मोत्यांनी सजवलेली शिवकालीन पगडी घातली.

मावळे किंवा मावळी पगडी ही शिवरायांच्या स्वराज्यातील सैनिक अर्थात मावळे परिधान करीत असत. ही पगडी लाल रंगाची असते. आज मोदींना परिधान केलेली पगडी ही लाल रंगाचीच असून, ती मोत्यांनी सजवली होती. मोदी सभास्थळी दाखल होताच छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी अशा घोषणा देण्यात आला. यावेळी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

पंतप्रधान मोदी यांनी आज सकाळी कर्तृत्ववान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या कार्यक्रमाला शुभेच्छा देत, या अनोख्या उपक्रमांसाठी जात असल्याचे ट्विट केले. या आपल्या ट्विटमध्ये पंतप्रधानांनी मुख्यमंत्र्यांचे तोंड भरून कौतुक केले. जनतेच्या प्रश्नासंदर्भात आपण केलेल्या कामांची माहिती देण्याचा आणि संवाद साधण्याचा हा एक स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्र हा मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली दैदिप्यमान अशी प्रगती करत असून महाराष्ट्राला त्यामुळे स्थैर्यता लाभण्यास मदत होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Udyanraje Bhosale felicitate Narendra Modi in Nashik