UGC NET Exam 2023 : यूजीसी-नेट डिसेंबर सत्र नोंदणीची 28 पर्यंत मुदत

UGC NET exam
UGC NET examsakal media

UGC NET Exam 2023 : राष्ट्रीय प्राध्यापक परीक्षा (यूजीसी-नेट) २०२३ अंतर्गत डिसेंबरच्‍या दुसऱ्या सत्रातील परीक्षेसाठी नोंदणीप्रक्रिया सुरू झाली आहे.

उमेदवारांना २८ ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन स्वरूपात नोंदणी करता येणार आहे. ६ ते २२ डिसेंबर या कालावधीत देशभरात यूजीसी-नेट परीक्षा घेण्याचे नियोजित आहे. (UGC NET December Session Registration Deadline 28 october news )

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए) यांच्‍यातर्फे यूजीसी-नेट परीक्षेच्‍या संदर्भातील महत्त्वाच्‍या सूचना व महत्त्वाच्‍या तारखांचा तपशील जाहीर केलेला आहे. सहाय्यक प्राध्यापक, तसेच ज्युनिअर रिसर्च फेलोशिप यांच्‍या पात्रतेकरिता होत असलेल्‍या यूजीसी-नेट २०२३ अंतर्गत डिसेंबर सत्राच्‍या परीक्षेचे आयोजन केले जाणार आहे.

यापूर्वी जून सत्रातील परीक्षा पार पडली असून, काही दिवसांपूर्वी या परीक्षेचा निकालदेखील जाहीर करण्यात आला होता. वर्षातून दोन वेळा घेतल्‍या जाणाऱ्या या परीक्षेचे दुसरे सत्र डिसेंबरमध्ये आयोजित केले जाते.

त्‍यानुसार प्रक्रिया राबविली जाते आहे. इच्‍छुक उमेदवारांना संकेतस्‍थळावर नोंदणी करण्यासाठी २८ ऑक्‍टोबरपर्यंत मुदत दिलेली आहे.

UGC NET exam
MPSC : सरकारी नोकरी करत 'शुभम'ने घातली यशाला गवसणी

२९ ऑक्‍टोबरपर्यंत ऑनलाइन पद्धतीने शुल्‍क भरायचे आहे. ऑनलाइन अर्जात दुरुस्‍तीची मुदत ३० व ३१ ऑक्‍टोबर, अशी दिली जाणार आहे.

८३ विषयांमध्ये परीक्षेचे आयोजन

यूजीसी-नेट परीक्षा एकूण ८३ विषयांकरिता घेतली जाणार आहे. सत्रपद्धतीने संगणकावर आधारित (कॉम्‍प्‍युटर बेस्‍ड टेस्‍ट) ही परीक्षा असेल. वस्‍तुनिष्ठ स्वरूपाचे प्रश्‍न परीक्षेत विचारले जाणार आहेत.

एका उमेदवाराने केवळ एकच अर्ज भरायचा आहे, अशा स्‍पष्ट सूचना एनटीएने दिल्‍या आहेत. तसेच अर्ज भरताना परीक्षा केंद्रासाठी शहरांची निवड नोंदवायची आहे. परीक्षा केंद्राचा पत्ता आणि परीक्षेची तारीख व वेळ असा सविस्‍तर तपशील प्रवेशपत्रासोबत उपलब्‍ध करून दिला जाणार आहे.

UGC NET exam
Success Story : अनाथ ,जन्मांध माला शंकरबाबा पापडकरचे MPSC परीक्षेत घवघवीत यश

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com