उजनी धरणाची सुरु झाली "प्लस'कडे वाटचाल 

संतोष सिरसट 
Saturday, 18 July 2020

सोलापूर ः जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाची वाटचाल "प्लस'कडे सुरु झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. 16 जूनला धरणाची पाणीपातळी वजा 23 टक्‍याच्या पुढे गेली होती. पण, चांगली सुरवात केलेल्या पावसाने धरण "प्लस'मध्ये येण्यास सुरवात झाली आहे. 

उजनी धरणावर सोलापूरसह पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकरी अवलंबून आहेत. धरण केव्हा शंभर टक्के भरते याकडे या तिन्ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागलेले असते. यंदा पावसाने चांगली सुरवात केल्याने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होऊ लागली आहे. धरण परिसरात चांगला पाऊस झाल्याने ही वाढ होऊ लागली आहे. पुणे जिल्ह्यातील धरणे अद्यापही भरली नाहीत. त्यामुळे त्या धरणातील पाणी उजनीमध्ये येण्यास अद्यापही वेळ लागणार आहे. पण, धरण परिसरात पडलेल्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ होण्यास मदत झाली आहे. धरणात आज सायंकाळी सहा वाजता दौंड येथून दोन हजार 223 क्‍सुसेकने पाणी येत होते. सायंकाळी सहा वाजता धरणाची पाणीपातळी शून्य इतकी झाली होती. आज रात्रीपासून धरणाची पाणीपातळी "प्लस'मध्ये येण्यास सुरवात झाली आहे. पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे धरणात येणारा पाण्याचा वेग कमी होऊ लागला आहे. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The Ujani dam started moving towards "Plus"