Ujani Dam Update: उजनी धरण रविवारपर्यंत प्लसमध्ये येणार! धरण मायनस १८ टक्के; सध्या दौंडवरून २४ हजार क्युसेकचा विसर्ग धरणात

Ujani Dam Update: लोणावळा, खडकवासला, भीमाशंकर धरण साखळीत आणि उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनीत सध्या दौंडवरून २४ हजार क्युसेक विसर्गाने पाणी जमा होत आहे. मागील १५ दिवसांत उजनीची पाणीपातळी १९ टक्क्यांनी वाढली आहे.
ujani dam solapur
ujani dam solapur sakal
Updated on

Solapur : लोणावळा, खडकवासला, भीमाशंकर धरण साखळीत आणि उजनी धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे उजनीत सध्या दौंडवरून २४ हजार क्युसेक विसर्गाने पाणी जमा होत आहे. मागील १५ दिवसांत उजनीची पाणीपातळी १९ टक्क्यांनी वाढली आहे.

सोलापूर, धाराशिव, नगर, बारामती, इंदापूर या शहरांचा पाणीपुरवठा प्रामुख्याने उजनी धरणावर अवंलबून आहे. दुसरीकडे बारामतीसह सोलापूर जिल्ह्यातील अनेक एमआयडीसींना उजनीतूनच पाणी मिळते. सोलापूर, पुणे, नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उजनीचा मोठा आधार आहे.

रब्बीच्या सोलापूर जिल्ह्यात खरिपाचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढले असून सर्वाधिक साखर कारखान्यांचा जिल्हा म्हणून सोलापूरची देशभरात ओळख आहे. पण, दरवर्षी उन्हाळा सुरु होण्यापूर्वी उजनी मायनसमध्ये जाते. पावसाळा लांबल्यास टंचाईची भीती उद्‌भवते.

यंदाही अशीच स्थिती निर्माण झाली होती. ९ जुलैपर्यंत धरणातील पाणीसाठा मायनस ३६ टक्के झाला होता. पण, १० जुलैपासून पुणे जिल्ह्यात पावसाला सुरवात झाली आणि सर्वांचीच चिंता दूर झाली. आता दौंडवरून उजनीत २४ हजारांवर विसर्ग सुरु असल्याने सात-आठ दिवसांत उजनी प्लसमध्ये येईल, असा विश्वास लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केला.

धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ५३.८९ टीएमसी

  • जिवंत साठा

  • मायनस १२.०३ टीएमसी

  • पाण्याची टक्केवारी

  • मायनस १८.१४ टक्के

  • उजनीत येणारा विसर्ग

  • २४००० क्युसेक

‘खडकवासला’तून आणखी वाढणार विसर्ग

खडकवासला धरण सध्या ८८ टक्क्यांवर पोचले आहे. पुढील तीन दिवस पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता असल्याने खबरदारी म्हणून खडकवासला धरणातून मंगळवारी दुपारी ५०० क्युसेकचा असलेला विसर्ग रात्री अकरानंतर साडेतीन हजारांवर पोचला होता. त्यात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.

दुसरीकडे कलमोडी व वडिवळे ही दोन्ही धरणे ६० टक्क्यांहून अधिक भरली आहेत. सध्या या दोन्ही धरणातून चार हजार ८०० क्युसेकचा विसर्ग लोणावळ्यातून इंद्रायणी नदीतून पारगाव- दौंडजवळ मिळत आहे. त्यामुळे पुढील सहा-सात दिवसांत उजनी धरण प्लसमध्ये जाईल, अशी शक्यता अधिकाऱ्यांनी वर्तविली आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.